0
मिझोराम विधानसभा अध्यक्षांसह अनेक काँग्रेस नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे

ऐझोल- मिझोराम विधानसभेच्या 40 जागांसाठी मतमोजणी सुरू झाली आहे. पहिला कल सकाळी 11 वाजेपर्यंत समोर येण्याची अपेक्षा आहे. मतमोजणी केंद्रावर पोलिसांचा चोख बंदोबस्त आहे. एक्झिट पोल्सनुसार मिझोराममध्ये मिझो नॅशनल फ्रंट अर्थात एमएनएफ सत्ता काबिज करू शकते. दरम्यान, एमएनएफ ‍आणि काँग्रेसमध्ये काट्याची लढत पाहायला मिळत आहे.

- मिझोराममधील 40 जागांचे कल समोर आले आहेत. 24 जागांवर एमएनएफ, 10 जागांवर काँग्रेस, एक जागेवर भाजप आणि 5 जागांवर इतर पक्ष आघाडीवर आहेत.

- मिझोराममध्ये एमएनएफला बहुमत मिळत असल्याचे सध्याचे चित्र आहे. 40 पैकी 23 जागांवर एमएनएफ आघाडीवर आहे.

- एमएनएफचे उमेदवार आर लालजिरलिएना तावी यांनी काँग्रेसचे रोसिआम्मघेता यांच्यापेक्षा 200 मतांनी आघाडीवर

दरम्यान, मिझोराम 40 जागांसाठी 28 नोव्हेंबरला मतदान झाले होते. येथे 10 वर्षांपासून काँग्रेस सत्तेत आहे. मुख्यमंत्री ललथनहवला तीन वेळा मुख्यमंत्री बनले. 2013 मध्ये काँग्रेसने 34 जागा जिंकल्या होत्या. यावेळी विधानसभा अध्यक्षांसह अनेक काँग्रेस नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भाजप येथे हेमंत बिस्व शर्मा यांच्या नेतृत्वात लढत आहे.

पूर्वोत्तरमध्ये काँग्रेसची सत्ता असलेले एकमेव राज्य
पूर्वोत्तरमध्ये काँग्रेसची सत्ता असलेले मिझोराम हे एकमेव राज्य आहे. इतर मेघालय, अरुणाचल प्रदेश, नागालंड, त्रिपुरा, आसाम, मणिपूर या सहा राज्यात भाजपची सत्ता आहे.

मिझोराम: 2013 चा निकाल

एकूण जागा- 40

काँग्रेस 34
एमएनएफ 5
एमपीपी 1
भाजप 0
सन 1987 मध्ये मिझोरम हे देशातील 23 वे राज्य बनले. तेव्हापासून येथे एमएनएफ किंवा काँग्रेसची सत्ता आहे. यावर्षी मात्र, काँग्रेस आणि मुख्य अपक्ष पक्ष एमएनएफमध्ये थेट लढत आहे. दुसरीकडे भाजपनेही कंबर कसली आहे. विधानसभा अध्यक्ष हिपेई यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. सप्टेंबरमध्ये काँग्रेसच्या पाच आमदारांनी राजीनामा दिला होता.

केंद्रात भाजपचा सहयोगी एमएनएफ उतरला स्वबळावर..

एमएनएफ हा केंद्र सरकारामध्ये भाजपचा सहयोगी पक्ष आहे. परंतु मिझोराममध्ये एमएनएफ स्वबळावर निवडणूक लढत आहे. यंदा विधानसभा निवडणुकीत 8 पक्षांचे 209 उमेदवार रिंगणात आहेत. सत्ताधारी काॅंग्रेसचे 40, एमएनएफ 40, भाजपचे 39, नॅशनल पीपल्स पक्ष 9 आणि नॅशनलिस्ट काँग्रेस 5 उमेदवार रिंगणात आहेत. 2013 मध्ये भाजपचे केवळ 17 उमेदवार रिंगणार होते. परंतु भाजपला एकही जागा मिळवता अाला नव्हती.
Mizoram Election Result 2018 LIVE Updates

Post a comment

 
Top