0
आता मुख्यमंत्री कोण हाच मूळ मुद्दा...

नवी दिल्ली / भोपाळ - मध्य प्रदेशात काँग्रेसच्या सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे. गेल्या 15 वर्षांपासून सत्तेवर असलेल्या भाजपचे मुख्यमंत्री शिवराज सिंह यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत पराभव स्वीकारला. तसेच सत्ता स्थापनेचा दावा करणार नाही असे स्पष्ट केले. तर दुसरीकडे मायावतींनी मध्य प्रदेशातून भाजपला हद्दपार करण्यासाठी काँग्रेसला समर्थन देणार असे बुधवारी जाहीर केले आहे.

मध्य प्रदेशात सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आला असून काँग्रेसला राज्यपालांनी भेटीसाठी वेळ दिला आहे. त्यातच बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेऊन काँग्रेसला समर्थन जाहीर केले आहे. काँग्रेसने मध्य प्रदेशासह राजस्थानात सुद्धा बहुमताकडे कूच केली आहे. तर भाजपला बहुमत मिळवता आलेला नाही. अशात भाजपला सत्तेतून हद्दपार करण्यासाठी काँग्रेसला समर्थन देत आहोत असे त्या म्हणाल्या.
काँग्रेस असा गाठणार बहुमताचा आकडा...
मायावती म्हणाल्या, "आमचा हेतू भाजपला सत्तेतून दूर ठेवणे आहे. आणि यासाठीच आम्ही मध्य प्रदेशात काँग्रेसला समर्थन देण्याचा निर्णय घेतला आहे." मध्य प्रदेशातील एकूण 230 जागांपैकी बहुजन समाज पक्षाच्या हातात 2 जागा आहेत. काँग्रेस या राज्यात सर्वात मोठा पक्ष ठरला तरीही त्यांना 116 चा जादुई आकडा पार करू शकलेला नाही. तर भाजपला सुद्धा फक्त 109 जागा मिळाल्या आहेत. अशात काँग्रेसच्या 114 आणि बसपच्या 2 जागांसह सहज सत्ता स्थापित करता येईल.Congress Set To From Government In Madhya Pradesh

Post a comment

 
Top