0
परराष्ट्र धोरण राष्ट्राध्यक्ष अचानक इराक दौऱ्यावर दाखल, सैनिकांची घेतली भेट

वॉशिंगटन- अमेरिका यापुढे जगाच्या सुरक्षेची ठेकेदारी करू शकत नाही. प्रत्येक देशाने आपल्या सुरक्षेची जबाबदारी घेतली पाहिजे, असे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे. गुरूवारी ट्रम्प यांनी अचानाक इराकच्या दौरा करून अमेरिकेच्या सैनिक तुकडीची भेट घेतली. यावेळी त्यांच्या समवेत पत्नी मेलानिया देखील होत्या. ट्रम्प म्हणाले, सिरियातून अमेरिकेती सैनिकांच्या मायदेशी परतण्याच्या प्रक्रियेत मुळीच विलंब होणार नाही. तुर्की किंवा इतर देशात इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेशी लढण्याची संपूर्ण जबाबदारी केवळ अमेरिकेची नाही. दुसऱ्या देशांनीही जबाबदारी उचलली पाहिजे. अमेरिकेच्या सैनिकांशी चर्चा केल्यानंतर ट्रम्प बगदादच्या असद हवाई तळावर दाखल झाले होते. अमेरिकेवर हल्ला झाल्यास दोषींना कधीही पाहिले नसतील अशा परिणामांना सामोरे जावे लागेल. सिरियातून सैन्य माघारी नेणार असल्याचे त्यांनी जाहीर केले होते.
जपानमध्ये अमेरिकेचे सर्वात जास्त सैनिक, अफगाणमध्ये ५ व्या स्थानी
फॅक्ट टँक प्यू रिसर्च सेंटरच्या मते, अमेरिकेचे दोन लाख सैनिक अनेक देशांत तैनात आहेत. सर्वाधिक ३९ हजार अमेरिकी सैनिक जपानमध्ये तैनात आहेत. त्यानंतर जर्मनीत ३५ हजार, दक्षिण कोरियात २ लाख ४२ हजार तर अफगाणिस्तानात ९ हजार १०० अमेरिकी सैनिक तैनात असल्याचे संस्थेचे म्हणणे आहे.
खंडात आशिया अग्रेसर, अमेरिकेचे ३८ टक्के सैनिक, युरोप दुसऱ्या स्थानी
आशिया, युरोप खंडात अमेरिकेचे सर्वाधिक सैनिक तैनात आहेत. आशियाई देशांत ३८ टक्के व युरोपीय देशांत ३२ टक्के अमेरिकी सैनिक तैनात आहेत. मध्य-पूर्व व उत्तर आफ्रिकेत १३ टक्के सैनिक तैनात आहेत. उर्वरित १४ टक्के इतर देशांत आहेत. यात पायदळ, नौदल, हवाई दलाच्या सैनिकांचा समावेश आहे.
इस्रायलवर रशियाचा संताप
रशियाने सिरियावरील इस्रायली हल्ल्यांवरून नाराजी व्यक्त केली आहे. संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते मेजर जनरल इगोर कोनाशेंकोव्ह म्हणाले, सिरियाच्या राजधानीजवळ इस्रायलच्या हवाई हल्ल्यांमुळे नागरी िवमान सेवेला धोका निर्माण झाला आहे. इस्रायलच्या ६ एफ-१६ विमानांद्वारे चिथावणीखोर कारवाई केली आहे. हल्ल्यादरम्यान दोन नागरिक विमानाला दमास्कस व बैरुटमध्ये उतरवण्याच्या तयारीत होते. या घटनेमुळे प्रवासी विमान सेवेला धाेका असल्याचे स्पष्ट झाले आहे. लेबनॉनचे कार्यकारी परिवहन मंत्री युसूफ फेनियानोस म्हणाले, इस्रायलच्या लढाऊ विमानांचा हल्ला प्रवासी विमानांच्या दृष्टीने जीवघेणा ठरला असता. परंतु सुदैवाने धोका टळला. लेबनॉन सरकार आता संयुक्त सुरक्षा परिषदेमध्ये तक्रार दाखल करणार आहे. सिरियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने देखील इस्रायलवर संकट वाढवण्याचा आरोप केला आहे.
Trump advised all the countries to take responsibility for security

Post a Comment

 
Top