0
दराेडेखाेरांची दहशत नीलेश अपार्टमेंटमध्ये पहाटेचा थरार; दांपत्याच्या गळ्याला चाकू लावून केली मारहाण


जळगाव- शहरातील सिंधी कॉलनी परिसरातील गणेश नगरात नीलेश अपार्टमेंटमधील दुसऱ्या मजल्यावरील घरात घुसून चार दरोडेखोरांनी दांपत्यास चाकूचा धाक दाखवला. गळा दाबून मारहाण केली. यानंतर मुलास पळवून नेण्याची धमकी देत दोघांच्या अंगावरील तसेच कपाटात ठेवलेले दाेन लाख ५६ हजार ९०० रुपयांचे सोन्याचे दागिने लांबवले. तसेच या परिसरातील आणखी दोन अपार्टमेंटमधील तीन घरे फोडली; परंतु त्यात चाेरट्यांच्या हाती काहीच गवसले नाही. मंगळवारी पहाटे ४ वाजता ही घटना घडली. दरोडेखोरांनी रात्रीच पिंप्राळा येथून एक चारचाकी चोरुन तिचाच वापर या गुन्ह्यात केला अाहे.

रितेश जवाहरलाल कटारिया यांच्या घरात हा दरोडा पडला. आठ दिवसांपूर्वीच कटारिया कुटंब या अपार्टमेंटमध्ये राहण्यासाठी आले आहे. शेजारी राहणाऱ्या साई अपार्टमेंटमध्ये ते सुरुवातीला राहत होते. दरम्यान, रेडिमेड कपड्यांचे व्यापारी असलेले रितेश कटारिया हे सोमवारी रात्री १२ वाजता पत्नी साक्षी व पाच वर्षांचा मुलगा पीयूष याच्यासह घरात झोपले होते. पहाटे चार वाजता दरोडेखोरांनी त्यांच्या घराच्या दरवाजास जोरदार धक्का देऊन उघडला. कडीकोयंडा दोन बारीक स्क्रूवर असल्यामुळे एकाच धक्क्यात दरवाजा उघडला. या आवाजाने कटारिया जागे झाले होते. घरात अंधार असल्यामुळे एका दरोडेखोराने बॅटरीचा प्रकाश कटारियांच्या चेहऱ्यावर मारला. यानंतर दुसऱ्या दरोडेखोराने चाकूचा धाक दाखवत बेडरूमकडे चाल केली. चारपैकी तीन दरोडेखोरांच्या हातात चाकू तर एकाच्या हातात बॅटरी होती. चौघांनी बेडरूमध्ये येऊन कटारिया दांपत्यास धमकावले. 'सब माल हमे दे दो, आवाज किया तो डाल देंगे, किसीको फोन किया तो बच्चे को भी उठा ले जायेंगे' अशी धमकी देत दरोडेखोरांनी कटारिया यांचा गळा दाबून मारहाण केली. नंतर कपाटाची चावी मागितली. चावी सोबत नसल्याचे कटारिया यांनी सांगताच एका दरोडेखोराने स्क्रू ड्रायव्हरच्या मदतीने कपाट उघडले. यानंतर कपाटात ठेवलेले दागिने, कटारिया दांपत्याच्या अंगावरील दागिने व मोबाइल असा एकूण दाेन लाख ५६ हजार ९०० रुपयांचा ऐवज दरोडेखोरांनी लांबवला. सुमारे अर्धा तास दरोडेखोरांनी कटारिया यांच्या घरात थांबून ऐवज लुटला. दरोडेखोर निघून गेल्यानंतर कटारिया यांनी घरातील दुसऱ्या एका मोबाइलवरून लहान भाऊ राेहित कटारिया यांना फोन केला. यानंतर परिसरातील काही नागरिक जागे झाले. पोलिसांना माहिती दिल्यानंतर जिल्हापेठ तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झालेे. या प्रकरणी जिल्हापेठ पोलिसांत गुन्हा दाखल केला.


कारचाेरीचा गुन्हा रामानंद पाेलिसांत :
दरोडेखोरांनी सोमवारी रात्री पिंप्राळा येथील विजय रमेश शिंपी यांच्या मालकीची चारचाकी (एमच-१९, क्यू- ४१३६) बनावट चावीचा वापर करून चोरली. याच चारचाकीचा वापर करुन त्यांनी पहाटे कटारीया यांच्या घरी दरोडा टाकला. चारचाकी चोरीचा गुन्हा रामानंदनगर पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.

अपर अधीक्षक घेणार बैठक :

या परिसरात नेहमी गंभीर स्वरुपाचे गुन्हे होत असतात. त्या अनुशंगाने माजी नगरसेवक अशोक मंधान यांच्यासह नागरिकांनी पोलिस गस्त वाढवण्याची मागणी केली आहे. अपर पोलिस अधीक्षक लोहीत मतानी १८ रोजी परिसरातील नागरिकांशी चर्चा करण्यासाठी बैठक घेणार आहेत. दरोडेखोरांनी या परिसरातील आणखी दोन अपार्टमेंटमधील तीन घरे फोडली; परंतु एेवज हाती लागला नाही. अशोका अपार्टमेंटमधील पहिल्या मजल्यावरील कन्हय्यालाल चावला व दुसऱ्या मजल्यावरील अशोक टिपरे यांची घरे फोडली. दोन्ही कुटुंबीय घरी नव्हते. चोरट्यांना काही मिळाले नाही. गोदडीवाला अपार्टमेंटमधील जुगल मंधान यांचे घर फोडले. तेथेही काही मिळाले नाही. यानंतर कटारियांच्या घरातून ऐवज लुटला. दरोडेखोरांनी चोरी करताना इतर फ्लॅटचे दरवाजे बाहेरून बंद केले होते. कटारिया यांच्या नीलेश अपार्टमेंटमध्ये वरच्या मजल्यावर भूपेंद्रसिंग यांच्या घराबाहेरच्या कुत्र्याने भुंकायला सुरुवात केली होती; परंतु बाहेरून दरवाजे बंद केल्यामुळे इतर लोक मदतीसाठी घराबाहेर येऊ शकले नाहीत.

चोरी, लुटमारीच्या घटना वाढल्या; पाेलिसांची रात्रीची गस्त ताेकडी 
शहरात सोमवारी पहाटे ३ भामट्यांनी दुचाकीवरून रपेट मारून चार मोबाइल लांबवले होते. तर गणेश कॉलनीजवळ मोबाइल दुकान फोडून ५३ हजार रुपयांचा ऐवज लांबवला होता. त्यानंतर कटारीयांच्या घरावर दराेडा पडला अाहे.

१- शहरातील सिंधी कॉलनी परिसरातील गणेश नगरात नीलेश अपार्टमेंटमधील दुसऱ्या मजल्यावरील घरात घुसून चार दरोडेखोरांनी दांपत्यास चाकूचा धाक दाखवला. गळा दाबून मारहाण केली. यानंतर मुलास पळवून नेण्याची धमकी देत दोघांच्या अंगावरील तसेच कपाटात ठेवलेले दाेन लाख ५६ हजार ९०० रुपयांचे सोन्याचे दागिने लांबवले. तसेच या परिसरातील आणखी दोन अपार्टमेंटमधील तीन घरे फोडली; परंतु त्यात चाेरट्यांच्या हाती काहीच गवसले नाही. मंगळवारी पहाटे ४ वाजता ही घटना घडली. दरोडेखोरांनी रात्रीच पिंप्राळा येथून एक चारचाकी चोरुन तिचाच वापर या गुन्ह्यात केला अाहे.

२- कटारिया हे आठ दिवसांपूर्वीच नीलेश अपार्टमेंटमध्ये राहण्यासाठी आले अाहेत. दोन वर्षांपूर्वी त्या घरात दीपक नाथाणी हे राहत होते. या वेळी चोरट्यांनी नाथाणी यांच्या घरात घुसून मोबाइल लांबवला होता.

लुटलेला ऐवज असा 
३ तोळ्याच्या चार बांगड्या 
३ तोळ्याची सोनसाखळी 
१ ताेळे वजनाचे ब्रेसलेट 
५ ग्रॅमची एक अंगठी 
१ ग्रॅमच्या तीन अंगठ्या 
४ ग्रॅम वजनाचे टॉप्स 
१ ग्रॅम नाकातली फुली 
१ महागडा माेबाइल


हिस्ट्रीशीटर्स तपासले 
दुपारी १२ वाजता पोलिसांनी शहरातील सर्व हिस्ट्रीशीटर्संना पोलिस ठाण्यांत बोलावून घेत चौकशी केली. दराेडेखाेरांनी दरवाज्याची जी कडी ताेडली हाेती तिची पाेलिसांनी चिकित्सकपणे पाहणी करून ठसे घेतले.

मोबाइल केला बंद, रोकड सुरक्षित : 
दरोडेखोरांनी पळून जात असताना कटारिया यांचा मोबाइल सोबत नेला होता. या घटनेनंतर कटारियांच्या भावाने या मोबाइलवर फोन केला असता, दरोडेखोराने रिसीव्ह करून ताे कट केला. त्यानंतर मोबाइल बंद केला आहे. मोबाइलचे शेवटचे लोकेशन सिंधी कॉलनी परिसरातीलच आहे. तर कटारिया यांच्या कपाटात कपड्यांच्या खाली ठेवलेली रोकड दरोडेखोरांना मिळून आली नाही. त्यामुळे ती सुरक्षित राहिली असल्याचे या वेळी सांगण्यात अाले.

श्वान पथकास घटनास्थळी केले पाचारण 
अपर पोलिस अधीक्षक डॉ. लोहित मतानी, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक बापू रोहोम, जिल्हापेठ पोलिस ठाण्याचे सुनील गायकवाड आदींनी पथकासह घटनास्थळाची पाहणी केली. या परिसरातील बँक, अपार्टमेंटच्या बाहेर असलेले सीसीटीव्ही फुटेज तपासले. बँकेच्या बाहेर असलेल्या कॅमेऱ्यात दरोडेखोरांच्या हालचाली कैद झाल्या आहेत; परंतु पहाटे अंधार असल्यामुळे फुटेज अस्पष्ट आहे. त्यामुळे पोलिस तपासाला गती मिळाली नाही. पोलिसांनी घटनास्थळी हातांचे ठसे घेतले आहेत. तपासासाठी श्वान पथकासही पाचारण केले हाेते.

कारने आले दरोडेखोर

दरोडेखोर एमएच १९ क्यू ४१३६ कारने आल्याची माहिती एका तरुणाने पोलिसांना दिली. सीसीटीव्हीत एका चंदेरी रंगाची चारचाकी आकाशवाणी चौकाच्या दिशेने जाताना दिसते. ही चारचाकी चाेरून त्यांनी हा दराेडा टाकल्याचा संशय अाहे.25 lakhs were given by threatening to flee the child in Jalgoan

Post a comment

 
Top