0
जामनेर / शेंदुर्णी - राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळ या चिन्हासमोरील मतदान यंत्राचे बटन दाबूनही मतदान होत नव्हते. त्याचबरोबर एका मोबाइलचे ब्लू टूथ सुरू केले असता ईव्हीएम मशिनचा पासवर्ड मागत असल्याचे आरोप करीत बुधवारी शेंदुर्णी येथील कार्यकर्त्यांनी चांगलाच गोंधळ घातला.
शेंदुर्णी नगरपंचायत निवडणुकीची तयारी अंतीम टप्प्यात पोहचली आहे. नगराध्यक्ष पदासाठी अर्ज वैध ठरलेले चार, तर नगरसेवक पदासाठीच्या १७ जागांसाठी दिग्गज उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. बुधवारी (दि.५) राजकीय पक्षाच्या स्थानिक प्रमुखांसह मोजक्या कार्यकर्त्यांना इव्हीएम मशिनबाबत माहिती देण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र पाटील यांनी बैठक बोलावली होती. या वेळी प्रात्यक्षिक दाखवविण्यासाठी आणलेल्या मतदान यंत्रावरील राष्ट्रवादीच्या घड्याळ या चिन्हासमोरील बटन दाबूनही मतदान होत नव्हते. तर राष्ट्रवादीच्या एका कार्यकर्त्याच्या मोबाइलचे ब्लू टूथ सुरू केले असता मोबाईलवर इंग्रजीत 'TORK T12 BOOM' असा ब्लू टूथ कोड दिसू लागला. तो इव्हीएमचा असून इव्हीएम मशीन मोबाइलचे ब्लू टूथ सुरू करून हॅक करता येत असल्याचे आरोप करीत कार्यकर्त्यांनी चांगलाच गोंधळ घातला. 
मात्र, तो कोड इव्हीएमचा नसून एखाद्या मोबाइलचा असेल असे प्रशासनातर्फे स्पष्ट करण्यात आले. तसेच मशिन खराब असल्यामुळे बटन दाबले गेले नाही, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. या वेळी राष्ट्रवादीचे नेते संजय गरूड हे दाखल झाले. त्यांनी इव्हीएमबाबत तक्रारी करतानाच सुप्रीम कोर्टाचा आदेश असतानाही व्हीव्हीपॅट नसल्याने अधिकाऱ्यांना धारेवर धरले. गरूडांच्या या प्रश्नाने अधिकारी निरूत्तर झाले. यावेळी उडालेला गोंधळ पाहता पोलिसांना पाचारण करावे लागले. तर बाहेरील कार्यकर्त्यांना शहरात प्रवेशबंदी केल्याची मागणी या वेळी गरूड यांनी केली. ती मागणी मान्य करीत निवडणूक निर्णय अधिकारी पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन जाहीर केले.

पोलिसांना विसर, उशिराने आगमन 
शेंदुर्णी हे गाव राजकीय दृष्ट्या संवेदनशील आहे. या शेंदुर्णी नगरपंचायतीची निवडणूक होत आहे. रविवारी (ता. ९ रोजी) मतदान असल्याने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून आवश्यक ते सोपस्कार पूर्ण केले जात आहेत. दरम्यानच्या काळात विविध प्रात्यक्षीके, मतदानाबाबत माहीती घेण्यासाठी नगरपंचायत कार्यालयात नेहमीच सर्वपक्षीय कार्यकर्त्यांची गर्दी असते. अशावेळी नियमित बंदोबस्त असावा. मात्र बुधवारी गोंधळ उडाला असताना एकही पोलिस याठिकाणी उपस्थित नसल्याने अखेर फोन करून पोलिसांना बोलावण्यात आले.

अायाेगाकडे तक्रार करणार 
इव्हीएम चाचणीसाठी राजकीय पक्षाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांना पाचारण करण्यात आले होते. या वेळी राष्ट्रवादीचे बटन दाबूनही मतदान होत नसल्याचा प्रकार निदर्शनास आला. मोबाइलचे ब्लू टूथ ऑन करून पाहिले असता ईव्हीएम पासवर्ड मागत होते. याचा अर्थ ते हॅक होऊ शकते. सुप्रीम कोर्टाचे आदेशाने इव्हीएमसोबत व्हीव्हीपॅट आवश्यक आहे. त्यामुळे केलेले मतदान व्यवस्थीत झाले किंवा नाही हे लक्षात येते. यापेक्षा पूर्वीप्रमाणेच बॅलेटपेपरवर मतदान घ्यावे. आयोगाकडे तक्रार करणार आहोत Problems in EVMs when voting

Post a Comment

 
Top