0
सर्वात महागड्या स्टार्सपैकी एक रजनीकांत फक्त एकच लग्जरी कार वापरतात.

बिझनेस डेस्क - महागडी आणि आलीशान कार चालवणे किंवा ठेवणे जवळपास प्रत्येकाला प्रतिष्ठेचे लक्षण वाटते. परंतु, गोष्ट सुपरस्टार रजनीकांतची असेल तर वेगळीच... शेकडो कोटींचे मालक आणि जगातील सर्वात महागड्या स्टार्सपैकी एक रजनीकांत फक्त एकच लग्जरी कार वापरतात. BMW X5 अशी ही कार रजनीकांत यांनी 2017 मध्ये खरेदी केली होती. त्याची किंमत 68 ते 78 लाखांच्या घरात आहे. रजनीकांत आज (12 डिसेंबर) रोजी आपला 68 वा वाढदिवस सेलिब्रेट करत आहेत.


अजुनही वापरतात Fiat कार
खऱ्या आयुष्यात अगदी साधे राहणीमान पसंत करणारे रजनीकांत कार सुद्धा साधारण वापरतात. लग्जरी कार विकत घेण्यापूर्वी ते Padmini Fiat वापरत होते. 1980 मध्ये त्यांनी आपल्या अॅक्टिंग करिअरची सुरुवात केल्यानंतर ही कार खरेदी केली होती. सेडान कारला प्रीमियरने लाइसेन्स अंतर्गत अॅसेंबल केले होते. त्या काळात या कारचा वेगळाच थाट होता. या व्यतिरिक्त रजनीकांत यांच्याकडे Toyota Innova, Honda Civic आणि Chevrolet Tavera सुद्धा आहे.


BMW 7-series ठोकरली...
शाहरुख खानने आपले होम प्रॉडक्शन Ra.One मध्ये रजनीकांतला रोल ऑफर केला होता. यासाठी शाहरुख रजनीकांत यांना भेट म्हणून BMW 7-series कार देत होता. परंतु, रजनीकांत यांनी शाहरुखचा प्रस्ताव आणि त्याची कार ठोकरली.
Car Collection Of Rajnikant And Other Facts on his Birthday

Post a comment

 
Top