श्रीसंतची पत्नी भुवनेश्वरीने यावर सडेतोड उत्तर दिले आहे.
नवी दिल्ली. 'बिग बॉस 12' च्या विजेत्याविषयी चर्चा सुरु झाल्या आहे. आता विजेता फिक्स झाला अशा अफवा प्रत्येक वर्षीनुसार ऐकायला मिळत आहेत. सोशल मीडियावर एस. श्रीसंत विजेता असल्याचे वृत्त आहे. बिग बॉसच्या चाहत्यांनी श्रीसंत फिक्स विजेता असल्यामुळे सोशल मीडियावर मोहित सुरु केली आहे. पण श्रीसंतची पत्नी भुवनेश्वरीने यावर सडेतोड उत्तर दिले आहे. बिग बॉस संपण्यापुर्वी नेहमी दिसते की, आपला आवडता कंटेस्टेंट कमजोर पडल्यावर चाहते दूस-या कंटेस्टेंटविरुध्द फिक्स विनर असल्याची मोहिम सुरु करतात. यावेळी या मोहिमेचा शिकार श्रीसंत झाला आहे.
'बिग बस 12' च्या विजेत्याविषयी सोशल मीडियावर अशाच काही चर्चा सुरु झाल्या. तेव्हा श्रीसंतची पत्नी शांत बसली नाही. तिने या ट्रोल करणा-यांना सडेतोड उत्तर दिले. भुवनेश्वरी श्रीसंतने आपल्या ट्विटर अकाउंटवर उत्तर देत लिहिले की, "चाहत्यांची असुरक्षितता पाहा. तुम्ही या अफवा पसरवत राहा, कारण मला वाटते की, एखादी गोष्ट वारंवार बोललो तर ती सत्य होते. त्यांनी इतरांप्रमाणे दोन महिने किंवा हाफ सीजनसाठी शो साइन केला नव्हता... आपल्या इनसिक्टोरिटीविषयी शांतच राहा."

Post a Comment