अमेरिकेची अॅम्बर राच्डी 24 वर्षे वयापर्यंत एवढी लठ्ठ झाली होती की, तिचे आयुष्य उद्ध्वस्त झाले होते.
वॉशिंग्टन - अमेरिकेची अॅम्बर राच्डी 24 वर्षे वयापर्यंत एवढी लठ्ठ झाली होती की, तिचे आयुष्य उद्ध्वस्त झाले. तिचे हात-पाय एवढे जाड झाले होते की, तिला हिंडण्या-फिरण्यात अडचण येऊ लागली होती. तिला कारमध्येही बसता येत नव्हते. तिचे वजन तब्बल 300 kg पर्यंत गेले होते आणि सातत्याने वाढतच चालले होते.
एका सायकोलॉजिकल प्रॉब्लेममुळे ती दिवसभर काही ना काही खातच राहत होती. खाल्ले नाही तर तिला अस्वस्थ व्हायला व्हायचे. ती दिवसातून चार-पाच वेळा भरपेट जेवल्यानंतरही आइस्क्रीम, डेझर्ट यासारख्या हायकॅलरीचे पदार्थही खात राहायची. एंबरचे आईवडील आणि प्रियकर रॉडी दिवसभर तिच्यासाठी जेवणाचा बंदोबस्त करत राहायचे. शेवटी या सगळ्याचा कंटाळा आल्याने तिच्या प्रियकरानेही तिच्यापासून दुरावा केला. यानंतर अॅम्बरने स्वत:मध्ये असा बदल केला की, लोकं तिला आता ओळखूही शकत नाहीत.
लोंबू लागली होती त्वचा...
अॅम्बरने बाहेर पडणे सोडून दिले होते, कारण कारमध्ये तिला 2 सीटवर मोठ्या मुश्किलीने बसता येत होते. अॅम्बरची त्वचा लठ्ठपणामुळे लटकू लागली होती. अनेक जागांवर स्किन दबलेली राहून तिला वेगवेगळे इन्फेक्शन होऊ लागले होते. प्रियकर रॉडीला अॅम्बर जाड असूनही पसंत होती, तरीही तो फ्रस्टेट होऊ लागला होता, कारण अॅम्बरच्या जाडेपणामुळे दोघांना इंटिमेटही होता येत नव्हते. शेवटी एम्बरने काही डॉक्टरांची मदत घेतली.
प्लेनमधून घेऊन गेले डॉक्टर
- अॅम्बरला प्लेनने होस्टनला नेण्यात आले, जेथे तिचे ऑपरेशन होणार होते. यापूर्वी डॉक्टरांनी तिला लिमिटेड डाएटिंग करायला लावली. बॉडी फॅट एवढे जास्त होते की, डॉक्टरही घाबरले होते. ऑपरेशन करणारे डॉ. नोवजरादन म्हणाले, ''तिचा पाय पाहून मी हैराण झालो होतो. एक पाय एका तक्क्यासारखा रुंद आणि थुलथुल होता. यामुळे आम्ही आधी डाएटिंगच्या माध्यमातून तिचे 10 किलो वजन कमी केले.''
कमी झाले 130kg वजन
यानंतर सर्जरीच्या माध्यमातून तिच्या शरीरातून 50 किलो चरबी काढण्यात आली. हळूहळू अनेक थेरपी, ऑपरेशन आणि एक्सरसाइजमुळे एंबरने 130 kg वजन कमी केले. ती आज 70kg किलो वजनाची आहे. ऑपरेशननंतर जेव्हा अॅम्बरच्या ब्वॉयफ्रेंडने तिला पहिल्यांदा पाहिले तेव्हा तो चकित झाला होता. काही नातेवाइकांना तर ती ओळखूसुद्धा आली नाही.
सोशल मीडियावर बनवले पेज
- स्वत:मध्ये बदल घडवून आणण्याची जिद्द आणि डॉक्टरांची मदत यामुळे अॅम्बरने स्वत:त सुंदर बदल केले. यानंतर तिने सोशल मीडियावर एक पेजही बनवले आहे, ज्यात ती आपले फोटोज आणि वीडियो शेअर करून लठ्ठपणामुळे त्रस्त लोकांमध्ये जागरूकता निर्माण करते.

Post a Comment