0
मृतांमध्ये चालक दलाच्या तिघांचा समावेश

अंकारा - तुर्कीची राजधानी अंकारामध्ये गुरुवारी एका रेल्वे स्थानकावर जलदगती रेल्वे पादचारी पुलास धडकल्याने झालेल्या अपघातात किमान ९ जणांचा मृत्यू झाला, तर ४६ हून जास्त लोक जखमी झाले.


ही रेल्वे अंकाराहून मध्य तुर्कीतील शहर कोन्याच्या दिशेने जात असताना हा अपघात झाला. अंकारात एक हायस्पीड रेल्वे आधी एका रेल्वे इंजिनावर धडकली व त्यानंतर पादचारी पुलास धडकल्याचे गव्हर्नर वासिप साहिन यांनी सांगितले. घटनास्थळावर पाठवण्यात आलेले बचाव पथक शोध मोहिमेत सहभागी झाले आहेत. दुसरीकडे धडकेनंतर गाडीचे दोन डब्बे पटरीहून उतरल्याचा दावा टीव्ही वाहिन्यांनी केला आहे. दरम्यान, तुर्कीसमोर रेल्वे रुळांवरून घसरण्याच्या घटनांचे आवाहन आहे. मार्च २०१४ मध्ये रेल्वे रुळावरून घसरून १० जण ठार झाले होते.यावर्षी जुलैमध्ये २४ जणांचा अशाच घटनेत मृत्यू झाला.


अंकारामधील अपघातानंतर घटनास्थळी बचाव दलाचे जवान धावले. डब्यात अडकलेल्यांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले जात होते. रेल्वेतून २०६ प्रवासी प्रवास करत होते.Railway accident in turkey, 9 dead

Post a comment

 
Top