0
महिलेने सांगितली 30 वर्षांपूर्वीची गोष्ट.

टोरंटो- कॅनडामध्ये राहणारी एक वृद्ध कोरियाची महिला जेव्हा बाथरूममध्ये घसरून पडली तेव्हा ती उपचारासाठी रूग्णालयात गेली. तेथे डॉक्टरांनी तिचा एक्स-रे पाहिल्यावर मनक्याच्या हाडाजवळ आणि कंबरेजवळ त्यांना काहीतरी टोकदार दिसले. तेव्हा त्या महिलेने सांगितले की, ती 30 वर्षांपूर्वी कोरियाच्या एक्यूपंक्चर क्लिनीकमध्ये गेली होती तेव्हा तेथे तिच्या शरीरात उपचार करताना काही सुया सोडल्या होत्या ज्या 30 वर्षानंतरी तिच्या शरीरात होत्या.

एक्स-रे पाहून कन्फ्यूज झाले डॉक्टर

- ही स्टोरी कॅनडाची राजधानी टोरंटोमध्ये राहणाऱ्या 94 वर्षांच्या महिलेची आहे जी बाथरूममध्ये घसरून पडल्यामुळे रूग्णलयात गेली.


- महिलेच्या मनक्यात आणि कंबरेत मार लागला होता, त्यामुळे डॉक्टरांनी तिचा एक्स-रे काढला आणि ते हैरान झाले.


- एक्यूपंक्चर उपचाराची एक पद्धत आहे ज्यात शरीरात छोट्या सुया सोडल्या जातात. यात सोन्याच्या सुयांचा उपयोग होतो. त्या सुया एक्स-रे आणि MRI कम्पटेबल असतात. दुसऱ्या कोणत्या धातुंचा वापर केला तर रूग्णाच्या जीवाला धोका निर्णान होतो.


- कंबरेत असलेल्या त्या सुयांमुळे त्या महिलेला आतापर्यंत जास्ती काही समस्या झालेली नव्हती त्यामुळे डॉक्टरांनी तिला यूरिनरी ट्रॅक इंफेक्शन (मूत्र नळीचे संक्रमण) आजाराच्या गोळ्या देऊन घरी पाठवले.
Doctors took X ray to find fractures but they found needles in back

Post a comment

 
Top