0
वॉशिंग्टन - अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष सीनिअर जॉर्ज बुश अर्थात जॉर्ज एचडब्लू बुश यांचे निधन झाले आहे. ते 94 वर्षांचे होते. त्यांच्या कुटुंबियांनी यासंदर्भातील अधिकृत घोषणा ट्विटरच्या माध्यमातून केली आहे. सीनिअर बुश हे जॉर्ज डब्लू बुश यांचे वडील होते. त्यांना शीत युद्ध संपविण्यासाठी केलेल्या अथक प्रयत्नांसाठी ओळखले जाते. माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज डब्लू बुश यांनी आपल्या वडिलांबद्दल ही दुखद वार्ता शेअर करताना त्यांनी आपल्या कुटुंबियांसह समस्त देशवासियांच्या कल्याणाची कामना केली. अशा वडिलांच्या जाण्याने घरातील सगळेच शोकाकूल आहोत. एखाद्या मुलाला किंवा मुलीला हवे असलेले ते जगातील बेस्ट वडील होते अशी प्रतिक्रिया जारी केली.Former US President George HW Bush Dies At 94

Post a Comment

 
Top