0

तेलगीमुळे तरन्नुम मुंबईतील सर्वात धनाढ्य बार गर्ल बनली होती.

मुंबई- बहुचर्चित तेलगी बनावट स्टॅम्प घोटाळा खटल्यातील सर्व सात आरोपींची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्‍यात आली आहे. जिल्हा व सत्र न्यायाधीश पी. आर. देशमुख यांनी सोमवारी निकाल दिला.

दरम्यान, देशभर गाजलेल्या या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार अब्दुल करीम तेलगी याचा 2017 मध्ये बंगळुरु येथे मृत्यू झाला होता. मल्टीपल ऑर्गन फेल्युअर झाल्याने तेलगीचा मृत्यू झाल्याचे सूत्रांनी सांगितले होते. 2001 मध्ये तेलगीला अजमेर येथून अटक करण्यात आले होते. तेव्हापासून तो तुरुगांत होता. तेलगीला डायबिटीज आणि हाय ब्लड प्रेशरचा त्रास होता. कोर्टाने त्याला बनावट स्टॅम्प घोटाळ्याप्रकरणी 30 वर्षांची शिक्षा सुनावली होती.

मीडिया रिपोर्ट्‍सनुसार तेलगीला एड्‍स होता. पोलिसांनी तेलगीला एचआयव्ही संक्रमित इंजेक्शन टोचल्याचाही आरोप करण्‍यात आला होता. परंतु या आरोपात कोणतेही तथ्य आढळून आले नाही. पोलिसांनी तेलगीला अटक केली होती तेव्हा त्याचे मेडिकल चेकअप करण्यात आले होते. तेव्हा त्याला एड्‍स झाला असल्याचे समोर आले होते.

तेलगीच्या वकिलांनी केला होता गंभीर आरोप...
तेलगीचे वकील एम.टी. नानीह यांनी पोलिसांवर गंभीर आरोप केले होते. पोलिसांनी तेलगीला एचआयव्ही संक्रमित इंजेक्शन टोचल्याचे अॅड. नानीह यांनी म्हटले होते. नंतर पोलिसांनी कोर्टात पुरावे सादर केले होते. तेलगीला पोलिसांनी अटक केल्यानंतर त्याची मेडिकल चेकअप केले होते. तेलगीला एड्‍स असल्याचे समोर आले होते.

बार डान्सर होती तेलगीची गर्लफ्रेंड
पोलिस सूत्रांनुसार, मुंबईची फेमस बार गर्ल तरन्नुम खान ही तेलगीची गर्लफ्रेंड होती. मुंबईतील अंधेरी राहारार्‍या तरन्नुम हिच्या वडिलांचे एक छोटेशे दुकान होते. दुकानातून मिळणार्‍या उत्पन्नातून संपूर्ण कुटुंबाचा उदरनिर्वाह भागविणे शक्य नव्हते. तरन्नुमच्या कुटुंबात भाऊ, ब‍हीणसह एकूण 6 जण होते.

तरन्नुमवर एका रात्रीत तेलगीने उडविले होते 93 लाख रुपये
पोलिसांनी दिलेली माहितीळ अशी की, तेलगी तरन्नुमचा चाहाता होता. त्याने एका रात्रीत तिच्यावर 93 लाख रुपये उडविले होते. 1992 च्या जातीय दंगलीत तरन्नुमचे घर आणि दुकानाची तोडफोड करण्‍यात आली होती. तिचे संपूर्ण कुटुंब रस्त्यावर आले होते. तिच्या वडिलांना हार्टअटॅक आल्याने त्यांनी खाट पकडली होते. त्यानंतर संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी तरन्नुमवर होती. घरची आर्थिक स्थिती ढासाळल्याने तरन्नुम हिला डान्स बारमध्ये काम करण्याची वेळ आली होती.

तेलगीमुळे तरन्नुम बनली होती मुंबईतील सर्वात धनाढ्य बार गर्ल
तेलगीला अटक झाल्यानंतर त्याने मुंबईतील दीपा बारमधील एका डान्सरवर लाखो रुपये उडविल्याचे समोर आले होते. तेलगीमुळे तरन्नुम मुंबईतील सर्वात धनाढ्य बार गर्ल बनली होती.
stamp scam abdul karim telgi was hiv positive bar girl was his girlfriend

Post a Comment

 
Top