0
91% स्पॅम कॉल भारतीय दूरसंचार कंपन्यांचे; ट्रूकॉलरचा अहवाल

नवी दिल्ली- फोनवर मार्केटिंग कंपन्या आणि फ्रॉड करणाऱ्यांचे काॅल तर येतच असतात मात्र सर्वाधिक बिनकामाचे फोन (स्पॅम) कोण करते याचा कधी तुम्ही विचार केलाय का. भारतात मोबाइल फोन युजरच्या फोनवर सर्वाधिक स्पॅम कॉल दूरसंचार कंपन्यांचेे येतात. १०० पैकी ९१ स्पॅम कॉल यांच कंपन्यांचे असतात. यात स्पेन दुसऱ्या क्रमांकावर असून येथील दूरसंचार कंपन्यांच्या स्पॅम कॉलचे प्रमाण ४६ टक्के आहे. फोन क्रमांक ओळखणारे अॅप ट्रू-कॉलरने मंगळवारी जाहीर केलेल्या एका अहवालात ही माहिती दिली आहे.

फसवणुकीच्या फोनबाबत कॅनडा अव्वल आहे. येथील युजरला ६९ टक्के स्पॅम कॉल फसवणुकीसंदर्भातील असतात. दक्षिण आफ्रिका ४९ टक्क्यांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. ट्रू-कॉलरने याच वर्षी जानेवारी ते ऑक्टोबर पर्यंत सर्वाधिक स्पॅम कॉलच्या २० देशांची यादी जाहीर केली आहे. यात भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. येथील लोकांना प्रत्येक महिन्याला सरासरी २२.३ अनावश्यक (स्पॅम) कॉल आले आहेत. गेल्या वर्षी २२.६ स्पॅम कॉलसह भारत जगात अव्वल क्रमांकावर होता. या वर्षी सर्वाधिक ३७.५ स्पॅम कॉल ब्राझीलच्या लोकांना आले आहेत. भारतीय युजरच्या फोनवर आलेले ६.१ टक्के कॉल स्पॅम होते.

जगभरातील युजर्सना ६५,००० कोटींचा चुना
भारतात गेल्या वर्षी ३ टक्के कॉल फ्रॉड करणाऱ्यांचे होते. या वर्षी त्यांची संख्या दुपटीपेक्षा जास्त ७ टक्के झाली आहे. कॅनडात त्यांची संख्या ६७ टक्क्यांनी वाढली आहे. फसवणूक करणाऱ्यांनी जगभरातील लोकांना सुमारे ६५,००० कोटी रुपयांचा चुना लावला आहे.

Post a Comment

 
Top