0
संधी साधून एका अज्ञात व्यक्तीने केंद्रातील पैशांची बॅग घेऊन पोबारा केला.

वैजापूर- बँक ऑफ महाराष्ट्रच्या ग्राहक सेवा केंद्रातून ९० हजार रुपये असलेली बॅग पळवल्याची घटना शुक्रवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास पंचायत समितीजवळ घडली. तालुक्यातील घायगाव येथील राहुल साळुंके हे पंचायत समिती कार्यालयाजवळ बँक ऑफ महाराष्ट्रचे ग्राहक सेवा केंद्र चालवतात. त्यांनी शुक्रवारी सकाळी महाराष्ट्र बँकेतून एक लाख ५० हजार रुपयांची रक्कम काढली व ही रक्कम घेऊन ते ग्राहक सेवा केंद्रात गेले. त्याठिकाणी रोकड असलेली बँकेत ठेऊन ते ग्राहकांच्या सेवेत व्यस्त होते. त्यावेळी एक अपंग ग्राहक पैसे काढण्यासाठी आला. पण त्यांना केंद्रात येणे सोयीचे नसल्याने साळुंके बायोमेट्रिक मशीनवर त्यांचा अंगठा घेण्यासाठी केंद्राच्या बाहेर आले. ही संधी साधून एका अज्ञात व्यक्तीने केंद्रातील पैशांची बॅग घेऊन पोबारा केला.

या घटनेची माहिती मिळताच पोलिस नाईक संजय घुगे यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, साळुंके यांनी बँकेतून रोकड काढल्यापासून त्या व्यक्तीने त्यांच्यावर नजर ठेवल्याचे बँकेच्या सीसीटीव्ही कँमेरामध्ये दिसून आले आहे.Stole case in Vaijapur

Post a Comment

 
Top