0
बाबा पुन्हा दिसल्यास त्याला सोडणार नाही अशी संतप्त प्रतिक्रिया गावकऱ्यांनी दिली आहे.

कैथल (हरियाणा) - कलायत येथील 330 वर्षे जुन्या बाबा डेरा राजपुरीचा 14 वा कथित महंत फरार झाला आहे. 58 वर्षीय ढोंगी बाबा सोमपुरीचे एक-दोन नव्हे तर तब्बल 9 अश्लील व्हिडिओ व्हायरल झाले. सोशल मीडियावर शेअर झालेल्या या व्हिडिओंचा पत्ता लागला तेव्हापासूनच या बाबाचा पत्ता नाही. या प्रकरणी गावकऱ्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. परंतु, अद्याप त्याला पकडण्यात यश आलेले नाही. हजारो गावकरी आणि भक्तांच्या आस्थेशी खेळ करणारा हा बाबा पुन्हा दिसल्यास त्याला सोडणार नाही अशी संतप्त प्रतिक्रिया गावकऱ्यांनी दिली आहे.


महंत सोमपुरीचा हा व्हिडिओ कुरुक्षेत्र येथील एका हॉटेलच्या खोलीत शूट झाला आहे. हा अश्लील व्हिडिओ स्वतः ढोंगी बाबानेच बनवल्याचे दिसून येते. या घटनेनंतर बाबा अंडरग्राउंड झाला आहे. व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसते की महिलेसोबत हा बाबा सिगारेट आणि दारु सेवन करत आहे. सोबतच दोघे अश्लील चाळे करतानाही दिसतात. समोरच्या खुर्चीवर बसलेली व्यक्ती त्यांना पोझिशनमध्ये येण्यास सांगून व्हिडिओ शूटिंग करत आहे. महिला आणि या बाबामध्ये जुने संबंध असल्याचे सांगितले जात आहे. बाबा डेरातून फरार झाल्यानंतर त्याची जबाबदारी गावातील 21 सदस्यीय समितीने घेतली आहे. या डेराची गावात 350 एकर जमीन आहे. दरवर्षी लागणाऱ्या याच डेराच्या जत्रेतून लाखोंचा दान मिळतो.

Post a comment

 
Top