0
चामराजनगर जिल्ह्याच्या सुलिवाडी गावात एका मंदिरात प्रसाद खाल्ल्यानंतर ही घटना

बंगळुरू- कर्नाटकच्या चामराजनगरात शुक्रवारी प्रसादातून विषबाधा झाल्याने ९ जणांचा मृत्यू झाला. त्यात एका महिलेचा आणि एका मुलीचा समावेश आहे. ८० जण आजारी पडले असून अनेकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आठ जणांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले. त्यांना म्हैसुरूच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

चामराजनगर जिल्ह्याच्या सुलिवाडी गावात एका मंदिरात प्रसाद खाल्ल्यानंतर ही घटना घडली. लोकांनी पोटदुखी आणि उलट्या होत असल्याची तक्रार केली. पोलिस अधीक्षक धर्मेंद्रकुमार मीणा यांनी सांगितले की, मंदिर व्यवस्थापनाच्या दोन लोकांना ताब्यात घेण्यात आले आहे. प्रसादात विष मिसळण्यात आले आहे, असा संशय व्यक्त केला जात आहे. प्रसादाचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.Precipitate poisoning in Karnataka

Post a Comment

 
Top