0
कुत्रा मेल्यानंतर महिला नाव नोंदवण्यास तहसील येथे गेली तेव्हा उलगडा

पालनपूर - गुजरातमध्ये पालनपूर जिल्ह्यातील जेतवास गावात एका कुटुंबाने ८ वर्षे काळू या कुत्र्याच्या नावे रेशन उचलले. पण कुत्र्याचा मृत्यू झाला अन्् नव्या सुनेचे नाव नोंदवण्यासाठी तहसील कार्यालयात महिला पोहोचली तेव्हा कुत्र्याच्या नावाचा उलगडा झाला. याबाबत माहिती अधिक अशी की, या कुटुंबाची अार्थिक परिस्थिती चांगली नाही. काही दिवसांपूर्वी घरात आलेल्या मुगली या नव्या सुनेचे नाव नोंदवण्यासाठी कार्यालयात खेटे मारत होते. परंतु कोणी ऐकून घेण्यास तयार नव्हते. तेव्हा स्वत: मोगलीबाई स्वत: तहसील कार्यालयात गेली. तेथील कर्मचाऱ्यांना काळू नावाच्या कुत्र्याचे नाव रेशन कार्डात लिहू शकता तर माझे नाव का लिहून घेत नाही? असा प्रश्न विचारला. तिचा प्रश्न ऐकून कार्यालयात एकच खळबळ उडाली. प्रकरण अंगलट येण्याची चिन्हे दिसताच तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी आपली चूक दुरुस्त केली. मोगलीबाई म्हणाली, आठ वर्षांपूर्वी जेव्हा जनगणना झाली होती, तेव्हा जनगणना करणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्या कुटुंबाने काळू कुत्र्याचे नाव रेशन कार्डासाठी दिले होते.Doggies name on Ration Card in gujarat

Post a Comment

 
Top