गोरेगावातील म्हाडा वसाहतीत रविवारी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास इमारत कोसळली.
मुंबई- गोरेगावमध्ये आझाद मैदानाजवळ निर्माणाधीन असलेली इमारत रविवारी सकाळी कोसळली. या दुर्घटनेत एका व्यक्तीला मृत्यू झाला असून 8 जण जखमी झाले आहेत. तर अनेकजण ढिगार्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. जखमींवर सिद्धार्थ रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान, या दुर्घटनेनंतर राष्ट्रीय आपत्ती निवारण पथक (एनडीआरएफ) घटनास्थळी दाखल झाले असून बचावकार्य युद्धपातळीवर सुरु आहे.
मिळालेली माहिती अशी की, गोरेगावातील म्हाडा वसाहतीत रविवारी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास इमारत कोसळली. रामू (22) असे मृत तरुणाचे नाव आहे. तो बांधकाम मजूर असल्याचे समजते.

Post a Comment