सह पोलीस आयुक्त देवेन भारती यांनी फेटाळले चेंगराचेंगरीचे वृत्त
मुंबई. मीठीबाई कॉलेजमध्ये गुरुवारी रात्री उशीरा वार्षिक स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमादरम्यान चेंगराचेंगरी झाली. यामध्ये 8 विद्यार्थी जखमी झाल्याचे वृत्त आहे. जखमींना उपचारांसाठी कूपर हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले. यामधून तिघांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
कलोझियम हा मॅनेजमेंट फेस्टिवल सुरु होता
मिठीबाई कॉलेजमध्ये प्रत्येक वर्षी प्रमाणे यावर्षीही कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. गेल्या दोन दिवसांपासून कॉलेजमध्ये कलोझियम मिठीबाई कॉलेजमध्ये दरवर्षीप्रमाणे यंदाही वार्षिक कार्यक्रम घेतले जात आहेत. गेल्या दोन दिवसांपासून कॉलेजमध्ये कलोझियम हा मॅनेजमेंट फेस्टिवल सुरु होता. ज्यात काल रात्री एक गाण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला डिवाईन रॅपरला बोलवण्यात आलं होतं. आपण फरफॉर्म करणार आहोत, अशी पब्लिसिटी त्याने केली होती. त्यामुळे त्याच्या चाहत्यांची गर्दी वाढली. परंतु ते विद्यार्थी नव्हते, त्यांनी गेटवर गर्दी केली होती. यावेळी सुरक्षारक्षकांनी त्यांना रोखलं. यावेळी झालेल्या गोंधळात काही विद्यार्थ्यांना इजा झाली. त्यापैकी काहीजण कूपर हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत.
सह पोलीस आयुक्त देवेन भारती यांनी फेटाळले चेंगराचेंगरीचे वृत्त
सह पोलीस आयुक्त देवेन भारती यांनी टाइम्स ऑफ इंडियाला प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी चेंगराचेंगरी झाल्याचे वृत्त फेटाळले आहे. महाविद्यालयात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हॉलमध्ये गर्दी जास्त झाल्याने 8 जणांना श्वास घेताना त्रास होऊ लागला. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सर्वांची प्रकृती सध्या स्थिर आहे असे ते म्हणाले.

Post a Comment