0
43 वर्षांच्या करिअरमध्ये कादर यांनी 300 चित्रपटांमध्ये केले काम आणि 250 चित्रपटांसाठी केले संवाद लेखन

* 2015 मध्ये आलेल्या 'दिमाग का दही' या चित्रपटात अखेरचे झळकले होते कादर खान

बॉलिवूड डेस्कः प्रसिद्ध अभिनेते आणि लेखक कादर खान यांची प्रकृती अतिशय नाजुक असून त्यांच्यावर कॅनडातील एका रुग्णालयात उपचार सुरु आहे. त्यांना BiPAP व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. प्रोग्रेसिव सुप्रान्यूक्लीयर पाल्सी डिसऑर्डरमुळे त्यांच्या मेंदुने काम करणे बंद केले आहे. स्पॉटबॉय या एंटरटेन्मेंट वेबसाइटच्या वृत्तानुसार, ही माहिती कादर खान यांचा मुलगा सरफराज खान याने दिली आहे.


दीर्घ काळापासून कॅनडात आहेत कादर खान
कादर खान गेल्या अनेक वर्षांपासून कॅनडा येथे त्यांच्या मुलासोबत वास्तव्याला आहेत. येथे त्यांचा मुलगा सरफराज आणि सून शाइस्ता वास्तव्याला आहेत. सरफराजने दिलेल्या माहितीनुसार, डॉक्टरांची एक टीम त्यांच्या प्रकृतीकडे लक्ष ठेऊन आहे. त्यांना श्वास घ्यायला त्रास होत असल्याने बाइपेप व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे.


काय असते पीएपी
प्रोग्रेसिव सुप्रान्यूक्लीयर पाल्सी (पीएसपी) एक असामान्य मेंदुचा आजार असून तो शरीराची हालचाल, बोलणे आणि दृष्टीला प्रभावित करतो. हा आजार मेंदुतील सर्व नर्व सेल्स नष्ट करण्याचे कारण ठरतो.

अशी आहे कादर खान यांची प्रकृती
बातम्यांनुसार, कादर खान क्वचितच शुद्धीवर येत आहेत. त्यांनी बोलणे बंद केले आहे. निमोनियाचे लक्षणही आढळून आले आहे. कादर खान यांचा मुलगा आणि सून त्यांच्या उपचारांमध्ये कुठलीही कसर शिल्लक सोडत नाहीयेत. पण आता कादर साहेबांनी प्रकृती अतिशय नाजुक झाली आहे.

गेल्या वर्षी झाली होती शस्त्रक्रिया
कादर खान यांचा मुलगा सरफराजने सांगितल्यानुसार, कादर साहेबांवर 2017 मध्ये गुडघ्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. तेव्हापासून त्यांची प्रकृती ढासळत चालली आहे.

Post a Comment

 
Top