0
महाराष्ट्रातील १ लाख ९ हजार अंगणवाड्यांमध्ये नाेंदणी झालेल्या ६१ लाख लाभार्थींपैकी सुमारे आठ लाख लाभार्थी बनावट

नवी दिल्ली- महाराष्ट्रातील १ लाख ९ हजार अंगणवाड्यांमध्ये नाेंदणी झालेल्या ६१ लाख लाभार्थींपैकी सुमारे आठ लाख लाभार्थी बनावट असल्याचे उघडकीस आले आहे. अंगणवाड्यांमध्ये नाेंदणी करताना आधार क्रमांक अनिवार्य केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आल्याची माहिती केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्रालयातील एका अधिकाऱ्याने दिली.

सहा वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांमध्ये वाढत असलेल्या कुपाेषणाशी लढा देण्यासाठी केंद्र व राज्य सरकार अंगणवाड्यांच्या माध्यमातून ग्रामीण भागात बालकांचे निरीक्षक केंद्र स्थापन करत आहे. अंगणवाड्यांतील या केंद्रांमार्फत गर्भवती व स्तनपान करणाऱ्या महिलांनाही पाैष्टिक आहाराचा पुरवठा केला जाताे. प्रत्येक लहान मुलाच्या पाैष्टिक आहारासाठी केंद्र सरकार प्रतिदिन ४ रुपये ८० पैसे व राज्य सरकार ३ रुपये २० पैसे खर्च करते. मात्र या पाेषण आहाराचा ग्रामीण भागात बनावट लाभार्थीच गैरफायदा घेत असल्याचे किंवा बाेगस आकडेवारी दाखवली जात असल्याचे आता उघडकीस आले आहे.

अंगणवाडी केंद्रात नावनाेंदणीसाठी अाता अाधार अनिवार्य करण्यात अाले अाहे. या लाभार्थींची खातरजमा करण्याची माेहीम केंद्र सरकारने देशभर सुरू केली अाहे. सर्वात अाधी ही माेहीम सुरू झालेल्या अासाममध्ये लहान मुलांच्या शारीरिक चाचणीदरम्यान १४ लाख मुले बाेगस लाभार्थी असल्याचे उघडकीस अाले. त्यानंतर देशभर ही माेहीम राबवली जात अाहे. उत्तर प्रदेशात १ लाख ८८ हजार अंगणवाड्यांमध्ये १४ लाख बनावट लाभार्थी सापडले. देशभरातील १४ लाख अंगणवाड्यांमध्ये सुमारे १४ लाख लाभार्थी मुलांची नाेंदणी करण्यात अाली अाहे.
8 lakh fake beneficiaries in the anganwadi centers

Post a Comment

 
Top