ख्रिसमस आज : गरिबांची सेवा करा, कोणाकडूनही काही फुकट घेऊ नका. स्वतःचे प्राण वाचवण्याऐवजी इतरांचे प्राण वाचवा
ख्रिसमस ख्रिश्चन समुदायाचा महापर्व आहे. हा सण प्रत्येक वर्षी 25 डिसेंबरला साजरा केला जातो. याच दिवशी प्रभू येशू यांचा जन्म झाला होता. ईश्वराचे पुत्र जीसस या सृष्टीवर लोकांना जीवनाचे ज्ञान देण्यासाठी आले होते. प्रभू येशूंनी सांगितले होते की, ईश्वर सर्व लोकांवर प्रेम करतात तसेच आपणही जीवनात प्रेमाच्या मार्गावर चालून ईश्वराची सेवा करावी. ख्रिसमसचा उत्सव आपल्याला हाच पवित्र संदेश देतो. ख्रिसमसच्या निमित्ताने जाणून घ्या, प्रभू येशूंचे अनमोल वचन...
1. कधीही हत्या करू नये. जो हिंसा कारले त्याला शिक्षा अवश्य मिळते. कधीही क्रोध करू नका, यामुळे स्वतःचेच नुकसान होते.
2. कधीही व्यभिचार करू नये. जो व्यक्त्त परस्त्रीवर कुदृष्टी टाकतो तो व्यभिचार आहे.
3. कधीही शपथ घेऊ नका. कारण तू एक केसही काळा किंवा पांढरा करू शकत नाही.
4. एखाद्याने तुमच्या उजव्या गालावर चापट मारली तर दुसरा गालही पुढे करा परंतु हिंसा करू नका.
5. कोणावरही दोष लावू नका. तुम्ही एखाद्याचे दोष काढले तर तुमच्यावरही दोष लागू शकतात.
6. गरिबांची सेवा करा. कोणाकडूनही काही फुकट घेऊ नका. स्वतःचे प्राण वाचवण्याऐवजी इतरांचे प्राण वाचवण्याचा प्रयत्न करा.
7. सर्वात श्रेष्ठ गोष्ट म्हणजे एकमेकांविषयी प्रेम बाळगा, कारण प्रेम अनेक पापांचा नाश करते.

Post a Comment