0

स्टीफन हॉकिंग यांना वयाच्या 21 व्या वर्षीच झाला होता दुर्लभ आजार, परंतु त्यांनी हार मानली नाही आणि बनले जगातील महान वैज्

xजगप्रसिद्ध वैज्ञानिक स्टीफन हॉकिंग यांचा जन्म ब्रिटनमध्ये 8 जानेवारी 1942 मध्ये झाला. वयाच्या 21 व्या वर्षीच त्यांना दुर्लभ आजार झाला परंतु ते डगमगले नाहीत आणि संपूर्ण जगात सर्वतश्रेष्ठ वैज्ञानिकांपैकी एक बनले. स्टीफन हॉकिंग केम्ब्रिज युनिव्हर्सिटीमध्ये सैद्धांतिक ब्रह्माण्ड विज्ञानाचे मुख्य होते. हॉकिंग यांना अल्बर्ट आइंस्टीननंतर सर्वात मोठे भौतिकशास्त्री मानले जाते. कॉम्प्युटर आणि इतर गॅजेट्सच्या मदतीने ते आपले विचार व्यक्त करत होते. स्टीफन हॉकिंग यांनी जीवनात यश प्राप्त करण्याचे विविध सूत्र सांगितले आहेत. या सूत्रांचा आपण अवलंब केल्यास जीवनात यश साध्य करू शकतो.


1. व्यक्तीचा सर्वात मोठा शत्रू मूर्खता नाही तर ज्ञानी असल्याचा भ्रम आहे. हॉकिंग यांचा बदलाकडे नेहमी सकारात्मक दृष्टिकोन होता. त्यांच्यानुसार ज्ञानाचा अर्थ बदलाचा स्वीकार करण्याची क्षमता बाळगणे असा आहे.


2. आपण आपल्या लोभ आणि मुर्खपणामुळे स्वतःचे अस्तित्व नष्ट करत आहोत. जीवन कितीही कठीण असले तरी आपण नेहमी काही न काही तर करून यशस्वी होऊ शकतो.


3. मी असेही लोक पाहिले आहेत, जे म्हणतात सर्वकाही आधिपासुनच निश्चित आहे आणि आपण ते बदलण्यासाठी काहीही करू शकत नाहीत, तेसुद्धा रस्ता ओलांडण्यापूर्वी दोन्ही बाजूला पाहतात.


4. तुम्ही वारंवार क्रोध किंवा तक्रारी करत असाल तर लोकांकडे तुमच्यासाठी वेळ राहणार नाही.


5. जेव्हा एखाद्याची इच्छा संपूर्णपणे नष्ट होते, तेव्हा त्याला प्रत्येक आशा गोष्टीचे महत्त्व समजते, जे त्याच्याजवळ आहे.


6. काम तुम्हाला अर्थ आणि उद्देश्य देते आणि याशिवाय जीवन अपूर्ण आहे.


7. प्रत्येक व्यक्तीकडे आयुष्यात काही तरी मोठे करून दाखवण्याची संधी असते, मग त्याच्या जीवनात किती अडचणी असू द्या.
quotes of Stephen Hawking

Post a comment

 
Top