0
देशाची गरिबी हटवण्यासाठी खर्च होतील लिलावातील पैसे.

नवी दिल्ली- मेक्सिकोचे राष्ट्रपति अँद्रेस मॅनुअल लोपेज ओब्राडोर या वर्षी सत्तेत आल्यापासूनच जनहिताचे निर्णय घेत आहेत. असाच एक निर्णय स्वत:ला मिळालेल्या विमानाबद्दल घेतला आहे. ओब्राडोर यांनी देशातले 70 प्लेन आणि 60 हेलीकॉप्टरच्या लिलावाची घोषणा केली आहे. हे ते विमान आहेत ज्यांना त्यांच्या आधीचे राष्ट्रपति वापरायचे. त्यापैकी एका विमानाच्या लिलावाची जास्ती चर्चा होत आहे, ते विमान बोइंग 787-8. या विमानला 2012 मध्ये तत्कालीन राष्ट्रपति फेलीप काल्डेरन वापरले होते आणि त्यावेळस विरोधकांनी या विमानाचा खासगी वापर करण्यात आल्याचा आरोप लावला होता. बोइंग 787-8 ची किंमत 21.87 कोटी डॉलर (1559 कोटी रूपये) आहे. मेक्सिकोच्या आर्थिक सचिवालयने म्हटले आहे की, बोइंग 787-8 विमानाची कॅलिफोर्नियाच्या विक्टरविलेमध्ये लिलाव होईल.


विमानात आहे लक्झरी हॉटल सारख्या सुविधा 
मेक्सिकन राष्ट्रपतिचे विमानात बोइंग 787-8 लग्झरी सुविधा आहेत. हे विमान कोणत्याही लग्झरी हॉटेल पेक्षा कमी नाहीये. यात लक्झरी सीट्स, लक्झरी डबल बेड आणि हायटेक सुविधा असलेले मोठे टॉयलेट आहेत. या विमानात राष्ट्रपतिचे कार्यालय पण आहे. यात वॉयरलेस, वाय-फाय, कॉफ्रेंस रूम, एंटरटेनमेंट रूम सोबतच अनेक लक्झरी सुविधा आहेत.

साध्या पद्धतीने आयुष्य जगतात मेक्सिकोचे राष्ट्रपति
मेक्सिकोचे नवीन राष्ट्रपतिना साध्या पद्धतीचे आयुष्य जगण्याची सवय आहे. त्यांनी राष्ट्रपति भवनाच न राहण्याचा निर्णय घेतला आहे. त्याशिवाय त्यांनी स्वत:च्या पगारातील फक्त 40 टक्के रक्कम स्वत:साठी वापरण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी मेक्सिकोच्या राष्ट्रपित पदाचा भार स्वीकारल्यानंतरही ते त्यांच्या जून्या छोट्या कारमधूनच फिरतात. त्यांनी बॉडीगार्ड ठेवण्यासही नकार दिला आहे. त्याशिवाय खासगी विमानाने प्रवास न करता ते सामान्य लोकांप्रमाणे साधारण विमानात प्रवास करतात. 
निवडणुकीत दिले होते विमान विकण्याचे वचन
ओब्राडोर यांनी एक जुलैला झालेल्या राष्ट्रपति पदाच्या निवडणुकीत मोठा विजय मिळवला होता. त्यांली भष्टाचाराच्या विरोधात माठी लढाई लढण्याचे वचन दिले होते. त्यांनी वचन दिले होते की जिंकल्यावर सरकारी विमान बोइंग 787-8 ड्रीमलाइन टीपी-01 विकुन यांतुन येणारे पैसे देशाच्या गरीबांसाठी चांगल्या सुविधा देण्यात लावण्यात येतील. त्यांनी म्हटले होते की, इतक्या गरीग देशाचा राष्ट्रपति असताना महागड्या विमानात फिरणे माझ्यासाठी खुप लाजिरवाणी गोष्ट आहे. 

विमानासाठी मिळाली 691 कोटींची ऑफर

मेक्सिकोच्या राष्ट्रपतिंचे लग्झरी जेट विमान खरेदी करण्यासाठी एका उद्योजकाकडून माठी ऑफर मिळाली आहे. गुस्ताव जिमेंस पोंस नावाच्या एका उद्योजकाने या विमानाची 691 कोटींची बोली लावली आहे.Luxury Planes of mexican president will be auctioned

Post a Comment

 
Top