0
असा असेल तुमचा नववर्षातील पहिला आठवडा

 • रिलिजन डेस्क. अंक ज्योतिषामध्ये जन्म तारखेच्या आधारावर स्वभाव आणि भविष्यातील गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. सोमवारी, 31 डिसेंबरपासून नवीन आठवडा सुरु होत आहे. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्याकडून जाणुन घ्या 31 डिसेंबर ते 6 जानेवारीपर्यंतचा आठवडा तुमच्यासाठी कसा राहिल.

  ज्या लोकांची जन्मतारीख 1,10,19 किंवा 28 आहे 
  नवीन वर्षात यश मिळण्याचे योग आहेत. या आठवड्यात तुमचे अडकलेले जुने काम पुर्ण होऊ शकते. बिघडलेले नाते सुधारु शकतात. आरोग्याकडे लक्ष ठेवा.
  ज्या लोकांची जन्मतारीख 2,11,20 किंवा 29 आहे 
  तुमच्यासाठी हा आठवडा मान-सन्मान वाढवणारा असेल. कौटूंबिक सुख मिळेल. धनलाभ होण्याची शक्यता आहे.
  ज्या लोकांची जन्मतारीख 3,12, 21 किंवा 30 आहे 
  घर-कुटूंबातील लोकांच्या मदतीने अडचणी दूर होऊ शकतील. अविवाहित लोकांना विवाहाचे प्रस्ताव मिळू शकतात. धनसंबंधीत कामांवर दुर्लक्ष करु नका.
  ज्या लोकांची जन्म तारीख 4,13,22 किंवा 31 आहे 
  धन संबंधीत कामांमध्ये यश मिळण्याचे योग आहेत. शत्रूंपासून सावध राहा. आरोग्याकडे लक्ष ठेवा.
  5,14 किंवा 23 जन्म तारीख असणारे 
  आता शांत राहून काम करा, जोशात काम करु नका, अन्यथा नुकसान होऊ शकते. क्रोध करु नका. मानसिक तणाव राहील.
  6, 15 किंवा 24 जन्म तारीख 
  या काळात तुम्हाला कठोर मेहनत करावी लागेल, पण यश मिळण्याचे योग आहेत. मान-सन्मान वाढेल आणि धन प्राप्तीचे योग आहेत.
  ज्या लोकांची जन्म तारीख 7, 16 किंवा 25 आहे 
  नियोजित काम बिघडू शकतात. क्लेश होऊ शकतात. अशांतीमुळे काम योग्यप्रकारे होऊ शकणार नाहीत. सावध राहून काम करा.
  ज्या लोकांची जन्म तारीख 8, 17, 26 आहे 
  मित्रांच्या साहाय्यामुळे अडचणी दूर करु शकता. कोणत्याही गोष्टीत लालचीपणा करु नका, अन्यथा नुकसान होऊ शकते. वातावरणातील बदलामुळे आजारी पडू शकता.
  ज्या लोकांची जन्म तारीख 9, 18 किंवा 27 आहे 
  तुमच्यासाठी हा आठवडा तणाव वाढवणारा राहिल. कुटूंब आणि कार्य स्थलावर निराशा राहिल. धैर्याने काम घ्या.weekly horoscope, saptahik rashifal, daily horoscope, rashifal 2019

Post a Comment

 
Top