0
आरोपीने जजना सांगितले- यामुळे मी मुलीला ठार केले, मग मृतदेह लटकावला पंख्यावर

  • भोपाळ - पोटच्या सहा वर्षीय निरागस मुलीवर बलात्कार करून तिची गळा दाबून हत्या करणाऱ्या नराधम बापाला विशेष न्यायाधीश कुमुदिनी पटेल यांनी मृत्युदंडाची शिक्षा ठोठावली आहे. त्यांनी आपल्या निकालात म्हटले की, ‘अफझलला तोपर्यंत फासावर लटकावले जावे, जोपर्यंत त्याचा मृत्यू होत नाही.'

    पंख्यावर लटकलेला होता मृतदेह 
    अफझलने न्यायाधीशांना सांगितले की, त्याला ती स्वत:ची मुलगी नसल्याचा संश्य होता. यामुळेच तिची हत्या केली. ही घटना 15 मार्च 2017 रोजी लालघाटी येथील बरेला गावातील आहे. चिमुरडीचा मृतदेह घरातील पंख्याला लटकलेला आढळला होता.
    डीएनए टेस्टमधून पकडले आरोपीला...
    चिमुरडीच्या हत्येनंतर अफझलने कोहेफिजा पोलिसांना मुलीचा संशयास्पदरीत्या मृत्यू झाल्याची माहिती कळवली होती. परंतु डॉ. गीता राणी गुप्ताने मुलीच्या पोस्टमार्टम रिपोर्टमधून खुलासा केला की, मृत मुलीवर बलात्कार झालेला असून तिची हत्या करण्यात आलेली आहे. पोलिसांनी 8 जणांची डीएनए टेस्ट केली होती. मुलीच्या कपड्यांवर लागलेले डाग अफझलच्या डीएनएशी जुळल्यानंतर त्याला अटक करण्यात आली होती.
    या वर्षी 19 जणांना मृत्युदंडाची शिक्षा...
    सन 2018 मध्ये देशभरातील न्यायालयांत सुरू असलेल्या एकूण 19 खटल्यांमध्ये मृत्युदंडाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. भोपाळमध्ये सोमवारी सुनावण्यात आलेल्या निकालापूर्वी इंदूर, ग्वाल्हेर, जबलपूर, कटनी, रतलाम, मंदसौर, नरसिंहपूर, सागर, धार, दतिया जिल्ह्यांतही लैंगिक गुन्ह्यांत फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे.Judge punishment for death of father accused of daughter repad and murder bhopal news

Post a Comment

 
Top