ठार झालेल्या दहशतवाद्यांपैकी एक परदेशी होता.
श्रीनगर - पुलवामा जिल्ह्यातील त्राल येथे शनिवारी सकाळी लष्कर आणि दहशतवाद्यांत चकमक उडाली. यामध्ये 6 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले आहे. ठार झालेल्या दहशतवाद्यांमध्ये एक परदेशी दहशतवादी अंसार गजवतुल हिंद याचा देखील समावेश आहे. तो जाकिर मूसा टोळीचा सदस्य होता असे सांगितले जात आहे. तर उर्वरीत दहशतवादी काश्मीरचेच आहेत. पोलिसांनी घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त केला आहे.

Post a Comment