0
ह्यूस्टन - अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज एच.डब्ल्यू बुश (९४) यांचे दीर्घ आजारानंतर निधन झाले. १९८९ ते १९९३ या कार्यकाळात त्यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्षपद भूषवले. ते ४१ वे राष्ट्राध्यक्ष होते. दुसऱ्यांदा निवडणूक लढवताना बिल क्लिंटन यांनी त्यांचा पराभव केला. चारच वर्षांनंतर बुश सीनियर यांचे चिरंजीव जी.डब्ल्यू बुश (बुश ज्युनियर) यांनी बिल क्लिंटन यांना हरवून अमेरिकेचे ४३ वे राष्ट्राध्यक्ष बनले. एप्रिल २०१८ मध्ये बुश सीनियर यांची पत्नी बार्बरा यांचे निधन झाले. यानंतर त्यांची प्रकृती बिघडली होती. वयाच्या १८ व्या वर्षी बुश यांनी शिक्षण सोडले. सैन्यात प्रशिक्षण घेऊन अमेरिकेतील सर्वात कमी वयाचे नौदलाचे वैमानिक बनले. दुसऱ्या महायुद्धात त्यांनी लढाऊ विमान चालवले. युद्धानंतर तय्ांनी येल विद्यापीठात प्रवेश घेतला. आर्टसमधून पदवी घेतली आणि सेल्सपर्सन म्हणून नोकरी सुरू केली. २० वर्षांच्या आत ते चेअरमन पदापर्यंत पोहोचत अब्जाधीश झाले. त्या काळात अमेरिकेत बिझनेस मुगल नावाचे प्रसिद्ध व्यावसायिक डोनाल्ड ट्रम्प (सध्याचे राष्ट्राध्यक्ष) यांच्याशी त्यांची चांगली मैत्री झाली. त्यानंतर ते राजकारणात आले. १९८१ ते १९८९ पर्यंत रोनाल्ड रीगन यांच्या कार्यकाळात ते दोनदा उपराष्ट्रपती आणि १९८९ मध्ये राष्ट्राध्यक्ष बनले. पिता-पूत्र राष्ट्राध्यक्ष बनणारी बुश सिनियर आणि ज्युनिअर यांची जोडी अमेरिकेतील दुसरी जोडी ठरली. याआधी जॉन एडम्स आणि जॉन क्वेंसी एडम्स राष्ट्राध्यक्ष होते. इराकचा हुकूमशहा सद्दाम हुसैनने १९९० मध्ये कुवैतवर आक्रमण केले होते. आखाती युद्धासाठी बनलेल्या आघाडीचे बुश यांनी नेतृत्व केले व इराकला हरवले. परिणामी सद्दामला कुवैतमधून सैन्य हटवावे लागले.

जन्म : १२ जून १९२४
मृत्यू ३० नोव्हेंबर २०१८George Bush, Dies at 94 , 41st President

Post a Comment

 
Top