0
मृतदेह पुरण्यासाठी जागा मिळत नसल्याचे कारण

जोहान्सबर्ग - दक्षिण अाफ्रिकेतील जाेहान्सबर्ग येथे मृतदेह पुरण्यासाठी जागा कमी पडत अाहे. त्यामुळे बहुतांश लाेक अाता जुन्या कबरी खाेदून त्याच जागी नवीन मृतदेहांवर अंत्यसंस्कार करू लागले अाहेत. या शहरात दर अाठवड्याला अशा ५० ते ६० कबरी खाेदल्या जात अाहेत.
वाढती लाेकसंख्या व विदेशींच्या स्थलांतरामुळे जाेहान्सबर्गमध्ये लाेकांची गर्दी वाढत अाहे. अधिकाऱ्यांच्या मते, जर ही लाेकसंख्या मर्यादित राहिली नाही तर पुढील ५० वर्षांत मृतदेह दफन करण्यासही जागा मिळणार नाही. डर्बनमध्ये सुमारे तीन दशकांपूर्वी अशीच समस्या उद‌्भवली हाेती. तेव्हा एड‌्स व वर्णभेदामुळे झालेल्या हिंसाचारात त्या ठिकाणी माेठ्या प्रमाणावर बळी गेले हाेतेे.


सरकार लवकरच अाणणार नवीन कायदा, मृतदेह पुरण्यासाठी इतर पर्यायांवरही चर्चा
कबरींचा पुनर्वापर करण्यासाठी सरकार कायदा करू शकते
कब्रस्तानांची समस्या दूर करण्यासाठी सरकार लवकरच कायदा करणार अाहे. त्यानुसार, कबरींचा दुसऱ्यांदा उपयाेग करण्याची परवानगी मिळू शकेल. याद्वारे सरकार वर्णभेद व असमानता संपवू शकेल. तसेच लाेकांना दफन करण्यासाठी जागाही मिळू शकेल.


दुसऱ्या पर्यायांचाही केला जात अाहे विचार
दक्षिण अाफ्रिकेतील कब्रस्तान असाेसिएशनचे अध्यक्ष डॅनिस इंग यांच्या मते, दफन करण्यासाठी जागा मिळत नसल्याची समस्या लाेकांना समजून घ्यावी लागेल. त्यामुळे कबरींचा पुनर्वापर करण्याचा किंवा मृतदेह जाळण्याचा विचारही करावा लागला. मात्र अाफ्रिकी देशांत मृतदेह जाळणे अजूनही परंपरेविराेधात मानले जाते. अाफ्रिकेत मृतदेह जाळण्यासाठी परवानगी मिळणेही अवघड अाहे. अधिकाऱ्यांच्या मते, लाेक मृतदेह जाळण्याच्या प्रक्रियेस नरकाच्या अागीत जळण्याच्या भावनेने पाहतात. तर काही जुन्या लाेकांच्या मते, माणूस मरणानंतरही संपूर्ण शरीरासह देवाकडे गेला पाहिजे, ताे जाळल्यानंतर ही इच्छा पूर्ण हाेऊ शकत नाही.johannesburg Reuse of Funeral Grave

Post a comment

 
Top