0
कंपनीवर स्पर्धा संपवण्याचा आरोप मेमध्ये एक कॅरेट सिंथेटिक हिऱ्याची किंमत २.९ लाख रु. होती, आता ५६,००० रुपये.

लंडन- जागतिक डायमंड बाजारात सध्या नवीन स्पर्धा सुरू आहे. ही स्पर्धा जगातील सर्वात मोठी डायमंड कंपनी डी बियर्स आणि सिंथेटिक डायमंड बनवणाऱ्या कंपन्यांच्या दरम्यान आहे. १३० वर्षे जुन्या डी बियर्सने पहिल्यापासूनच सिंथेटिक डायमंडची विक्री करण्यास नकार दिला होता. मात्र, याच वर्षी मे महिन्यात कंपनीने अशा हिऱ्यांची विक्री सुरू करणार असल्याची घोषणा केली होती. त्या वेळी एक कॅरेट खऱ्या हिऱ्याची किंमत ६,००० डॉलर (४.२ लाख रुपये) आणि सिंथेटिक हिऱ्याची किंमत ४,२०० डॉलर (२.९ लाख रुपये) होती. आता डी बियर्स ८०० डॉलर (५६,००० रुपये) प्रती कॅरेटच्या दराने सिंथेटिक हिऱ्यांची विक्री करत आहे.

डी बियर्स धोरणात्मक पद्धतीने सिंथेटिक हिऱ्यांचे दर कमी करत असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले. नफा कमी झाल्याने छोट्या कंपन्या बाजारातच राहणार नाही असे डी बियर्सचे धोरण असल्याचे त्यांनी म्हटले आहे. स्पर्धेतील कंपन्यांच्या मते डी बियर्स खर्चापेक्षा कमी किमतीवर सिंथेटिक हिऱ्याचा बाजार संपवण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, दोन्ही प्रकारच्या हिऱ्याच्या दरात फरक करण्याचा आणि त्यातून ग्राहकांना खऱ्या हिऱ्याची ओळख करून देण्याचा कंपनीचा प्रयत्न असल्याचे डी बियर्सने म्हटले आहे.

१९५४ मध्ये पहिल्यांदाच बनवला हाेता सिंथेटिक हिरा
> संशोधन संस्था जिमनिस्कीनुसार २०१८ मध्ये सिंथेटिक हिऱ्याचा जागतिक बाजार १३,००० कोटींचा असेल.
> हा वार्षिक २२ % वाढून २०२३ मध्ये ३६,००० आणि २०३५ मध्ये १.३५ लाख कोटी रुपयांचा होईल.
> ६.५ लाख कोटी रुपयांच्या हिरे दागिन्यांच्या बाजारात सिंथेटिकची भागीदारी २ % आहे. २०३५ पर्यंत ५% होईल.
> न्यूयॉर्कच्या जनरल इलेक्ट्रिक रिसर्च लॅबोरेटरीने १९५४ मध्ये पहिल्यांदा सिंथेटिक हिरा बनवला होता.


नैसर्गिक हिरा तयार होईपर्यंत मोठी साखळी

डायमंड अॅनालिसिस संस्था पॉल जिमनिस्कीनुसार सिंथेटिक डायमंडमध्ये ५० टक्क्यांपर्यंत नफा आहे. नैसर्गिक हिऱ्यामध्ये खाण कंपनीपासून ते ट्रेडर, पॉलिश करणारे, दागिने बनवणारे आणि किरकोळ विक्रेते अशी पूर्ण साखळी असते. यात सर्वांना नफा जोडावा लागतो. सिंथेटिक हिरे बनवणारे सरळ दागिने बनवणाऱ्यांना हिरे विकतात. त्यामुळे त्यामध्ये नफाही जास्त असतो.diamond business 80% rates drop in 6 months

Post a Comment

 
Top