नवी दिल्ली - राजस्थान आणि तेलंगणामध्ये मतदान थांबताच पाच राज्यांच्या एक्झिट पोलचे आकडे येण्यास सुरुवात झाली आहे. मध्यप्रदेशचे आतापर्यंत दोन सर्वे समोर आले आहेत. त्यात अॅक्सिस माय इंडिया-इंडिया टुडेच्या सर्वेत मध्यप्रदेशात काँग्रेस आणि भाजपमध्ये काट्याची टक्कर होईल असा अंदाज वर्तवला आहे. तर टाइम्स नाऊ-सीएनएक्सच्या सर्वेत भाजपला बहुमत मिळण्याचा अंदाज वर्तवला आहे. या दोन्ही सर्वेमध्ये छत्तीसगडचा किल्ला भाजप राखणार असा अंदाज वर्तवला आहे.

Post a Comment