0
नवी दिल्ली - ऑगस्टा वेस्टलँड व्हीव्हीआयपी हेलिकॉप्टर डील प्रकरणात भारतीय तपास संस्थांना मोठे यश मिळाले आहे. कोर्टाच्या आदेशानंतर या प्रकरणातील दलाल ख्रिश्चन मिशेलला रात्री उशिरा दुबईतून भारतात प्रत्यार्पित करण्यात आले. रात्री उशिरा CBI मुख्यालयात त्याची चौकशीही करण्यात आली. त्यानंतर पटियाला हाऊस कोर्टाच्या विशेष न्यायालयात त्याला हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला 5 दिवसांची सीबीआय कोठडी सुनावली आहे.
ऑगस्टा वेस्टलँड व्हीव्हीआयपी विमान व्यवहारात कोणाकोणाला पैसे देण्यात आले होते, याचा सीबीआय शोध घेणार आहे. मिशेलची चौकशी करून अनेक प्रश्नांची उत्तरे मिळवण्याचा सीबीआयचा प्रयत्न असणार आहे. युपीए सरकारच्या काळात हा व्यवहार झाला होता. यात अनेक गैरव्यवहार झाल्याचे आरोप भाजप आणि एनडीएने केले आहेत.

राहुल गांधी म्हणाले, रफालचे उत्तर द्या 
दरम्यान या प्रकरणी हैदराबादेत पत्रकारांनी राहुल गांधी यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी बोलताना राहुल गांधी म्हणाले, या मुद्द्यावर आम्ही यापूर्वीच भूमिका स्पष्ट केली आहे. पण आधी मोदींनी रफालमध्ये त्यांनी अनिल अंबानींच्या खिशात 30 हजार कोटी का घातले याचे स्पष्टीकरण द्यावे असे म्हणाले.

काय आहे प्रकरण.. 
2007 मध्ये युपीए सरकारच्या काळात हा व्यवहार जाला होता. पण 6 वर्षांनी लाचखोरीच्या आरोपांनंतर हा व्यवहार रद्द करण्यात आला होता. ऑगस्टा-वेस्टलँडची पॅरेंट कंपनी फिनमॅकिनावर इटलीमध्येही लाचखोरीचे आरोप लागले आहे. 2016 मध्ये याच प्रकरणी वायुदलाचे माजी प्रमुख एसपी त्यागी यांना अटक करण्यात आली होती.
5 days CBI custody to Christian Michel in augusta westland case

Post a Comment

 
Top