0
  • कोल्हापूर - गणपतीपुळे येथून देवदर्शन घेऊन परतणाऱ्या मिरजच्या भाविकांच्या कारचे टायर फुटून झालेल्या अपघातात पाच ठार, तर दोन मुले जखमी झाली. हा अपघात कोल्हापूर-पन्हाळा मार्गावर झाला. दरम्यान, मृतांमध्ये एका तरुणींसह चार मुलींचा समावेश असून त्यातील चार जणी एकाच कुटुंबातील आहेत.

    अश्विनी सुनील तांदळे (२६), अनिषा सुनील तांदळे (१४) ,जान्हवी सुनील तांदळे (७),बेबी सुनील तांदळे (३) आणि धनश्री शशिकांत माने (७,सर्व रा. दत्त कॉलनी, मालगाव रोड, मिरज) अशी मृतांची नावे आहेत, तर आदर्श नितीन तांदळे (५),ओम सुनील तांदळे (५) हे दोघे गंभीर जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

    मिरज येथील तांदळे आणि माने कुटुंब तवेरा कारने प्रवास करत हाेते. या वेळी कारमध्ये १६ जण होते. सर्वजण गणपतीपुळे येथून देवदर्शन करून परत येत होते. शुक्रवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास कोल्हापूर-पन्हाळा मार्गावर गाडीच्या मागील उजव्या बाजूचे टायर फुटल्याने गाडी रेडे डोह येथे जलपर्णी असलेल्या डबक्यात बुडाली. यामध्ये ५ जणांचा मृत्यू झाला. अपघाताची माहिती समजताच स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी कार पाण्याबाहेर काढली. त्यानंतर मृतदेह बाहेर काढून जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल केले. दरम्यान,अपघातानंतर परिसरात शोककळा पसरल्याचे पहायला मिळाले
    .News about tavera accident in kolhapur

Post a Comment

 
Top