दहावी नापास तर बस चालविण्यासही अपात्र : जज
दरम्यान, सीएएच्या वकिलांनी न्यायालयात सांगितले की, शैक्षणिक बोर्ड व विद्यापीठाचे पदवी प्रामाण्यता प्रक्रियेत सहकार्य होत नसल्याने ही समस्या जाणवत आहे. पीआयए पायलट, केबिन क्रू व अन्य कर्मचाऱ्यांचे दस्तऐवज उपलब्ध करून देण्यास विलंब लावतात. आम्ही अशा ५० कर्मचाऱ्यांना तत्काळ प्रभावाने निलंबित केले आहे. या सर्वांची शैक्षणिक कागदपत्रे बनावट आहेत.
लाहोर- पाकिस्तानची सरकारी हवाईसेवा पाक इंटरनॅशनल एअरलाइन्स (पीआयएस)मध्ये ५ पायलट आठवी इयत्ताही उतीर्ण नाहीत, अशी माहिती नागरिक उड्डयन प्राधिकरण (सीएए)ने शुक्रवारी सर्वाेच्च न्यायालयात दिली. सुनावणीदरम्यान न्यायमूर्ती एजाजुल अहसान यांनी म्हटले, "दहावी पास व्यक्ती बस चालवू शकत नाही. पण या लोकांनी विमान चालवून लोकांचा जीव धोक्यात घातला आहे.' प्राप्त माहितीनुसार, सर्वोच्च न्यायालयात पीआयएसमध्ये कार्यरत पायलट व अन्य कर्मचाऱ्यांची पदवी प्रामाण्यासंबंधी एका प्रकरणाची सुनावणी चालू आहे. मुख्य न्यायाधीश मियां साकिब निस्सार यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठात सुनावणी होत आहे.

Post a Comment