0
देशातील टॉप 5 श्रीमंत मुख्यमंत्र्यांमध्ये 2 काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांचा समावेश

नवी दिल्ली : काँग्रेसचे जेष्ठ् नेते कमलनाथ यांनी सोमवार रोजी मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यासोबतच ते 187 कोटी रूपयांच्या संपत्तीसह देशातील सर्वांत श्रीमंत मुख्यमंत्री बनले आहे. आतापर्यंत 177 कोटी रूपयांच्या संपत्तीसह आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू पहिल्या क्रमांकावर होते. देशातील टॉप 5 मुख्यमत्र्यांमध्ये 2 कांग्रेस, 1 भाजपा आणि इतर दोन स्थानिक पक्षांच्या मुख्यमंत्र्यांचा समावेश आहे.


कमलनाथ यांच्याकडे आहे 187 कोटींची संपत्ती 
2014 च्या लोकसभा निवडणुकीसाठी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार कमलनाथ यांच्याकडे एकूण 187 कोटी रूपयांची संपत्ती आहे. त्यातील 7.03 कोटी्ची चल तर 181 कोटी रूपयांची अचल संपत्ती आहे. यामध्ये परिवाराद्वारे चालवण्यात येणाऱ्या कंपन्या आणि ट्रस्टचा समावेश आहे.
कमलनाथ यांच्याकडे दोन गाड्या आहेत. यामध्ये दिल्ली येथे नोंदणी केलेली अम्बेसेडर क्लासिक कार आणि मध्य प्रदेशची नंबर प्लेट असणारी सफारी स्टॉर्म एसयूव्ही यांचा समावेश आहे. तसेच ते छिंदवाड़ा जिल्ह्यातील 63 एकर जमिनीचे मालक आहे.
याआधी सप्टेंबर 2011 मध्ये 273 कोटींच्या संपत्तीसह सरकारने त्यांना देशातील सर्वात श्रीमंत कॅबिनेट मंत्री घोषित केले होते.
now Kamalnath is richest cm in Indianow Kamalnath is richest cm in Indianow Kamalnath is richest cm in Indianow Kamalnath is richest cm in India

Post a comment

 
Top