0
थंडीच्या तीव्र लाटेने अवघा महाराष्ट्र काकडला.
नाशिक- उत्तर भारतात थंडीची लाट व तिकडून वाहणाऱ्या थंड वाऱ्यांच्या वेगात वाढ झाल्याने महाराष्ट्र गारठला आहे. नाशिक जिल्ह्यात वाकद शिरवडेला शून्य अंश तापमान होते. ओझरच्या एचएएल हवामान केंद्रात ०.९ अंश तापमान नोंद झाले. औरंगाबादेत ५० वर्षांतील नीचांकी ५.८ अंश सेल्सियस तापमान नोंद झाले.
२ अंशांचा आहे नीचांक
औरंगाबादेत डिसेंबर १९६८ मध्ये ५.२ अंश आणि २ फेब्रुवारी १९११ रोजी २ अंशांची नोंद चिकलठाणा वेधशाळेने घेतलेली आहे.

पाऱ्याचा विक्रमी नीचांक
नाशिक : १४ फेब्रुवारी १९७२ ला निफाडच्या गहू संशोधन केंद्रात उणे २.६ तापमान होते. २८ जानेवारी १९७३ ला -१.६ अंश तापमान होते.
परभणी : १५ वर्षांनंतर परभणीत शनिवारी ३ अंश तापमान नोंद झाले.
नांदेड : पारा ७.५ अंशांवर होता. ५ वर्षांतील सर्वात नीचांकी तापमान.
नागपूर : ३.५ अंश. ७ जानेवारी १९३७ ला ३.९ अंशांची नोंद होती.
अकोला : ५.९ अंश तापमान होते. हा ११५ वर्षांतील विक्रम आहे. ८ डिसेंबर १८८३ ला येथे ३.९ अंश तापमान नोंदवण्यात आले होते.
कडाका आणखी २ दिवस :
उत्तर भारतातील शीतलहर दोन दिवस कायम राहणार असून देशाच्या उत्तर, पश्चिम, मध्य आणि पूर्व भागामध्ये पुन्हा थंडीचा कडाका वाढण्याची शक्यता आहे.Lowest temperature today in the season in Ozar at Nashik Maharashtra

Post a Comment

 
Top