0
२७ डिसेंबर रोजी सायंकाळी दांपत्य घरी आल्यावर हा प्रकार उघडकीस आला.

औरंगाबाद- बँक कर्मचारी व नर्स असलेले पती-पत्नी नोकरीवर जाताच चोरट्यांनी त्यांच्या नागेश्वरवाडीतील घराचे कुलूप तोडून मंगळसूत्र, अंगठ्यांसह समोरील खोलीत ठेवलेली पिग्मी बँक असा ५६ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. २७ डिसेंबर रोजी सायंकाळी दांपत्य घरी आल्यावर हा प्रकार उघडकीस आला.

नागेश्वरवाडीतील चिंतामणी अपार्टमेंटमध्ये राहणारे गजानन आत्माराम आष्टुरकर (३१) हे एका बँकेत नोकरी करतात, तर त्यांच्या पत्नी घाटीत नर्स आहेत. २७ डिसेंबर रोजी सकाळी पावणेनऊ वाजेच्या सुमारास दोघेही कामावर गेले. रात्री पावणेआठ वाजता परत आले असता घराचे कुलूप तुटलेले व ते सोफ्यावर ठेवले होते. त्यांनी तत्काळ १०० क्रमांकावर कॉल करून हा प्रकार सांगितला. चोरांनी कपाटाचे लॉक तोडून ४८ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने व अंदाजे आठ हजार रुपये असलेला गल्ला चोरून नेल्याचे समोर आले. क्रांती चौक पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Stealing Case in Aurangabad

Post a Comment

 
Top