0
अफगाणी सुरक्षा दलाने काही दिवसांपासून तालिबानी अतिरेक्यांविराेधात माेहीम उघडली आहे.

काबूल- अफगाणिस्तानात सुरक्षा दलाने अतिरेक्यांविराेधात जोरदार कारवाई सुरू केली आहे. मागील २४ तासांत विविध ठिकाणी हवाई हल्ले करून ५५ तालिबानी अतिरेक्यांच्या खात्मा करण्यात आला.

लष्कराने दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी पूर्व भागातील अरयूब जाजाई जिल्ह्यात तालिबानी अतिरेक्यांच्या तळावर हल्ला करण्यात आला. त्यात कमीत कमी १३ जणांचा मृत्यू झाला व तालिबानी अतिरेक्यांचे एक वाहनही नष्ट झाले. त्यांनी तयार केलेले बंकरही उद्ध्वस्त झाले. उत्तर भागातील फारयाब प्रांतात साेमवारी हवाई हल्ले करण्यात आले. त्यात मुल्ला रसूलसह सहा दहशतवाद्यांचा मृत्यू झाला. दक्षिण भागातील लष्करी प्रवक्ते माेहंमद सादिक आयसा यांनी मंगळवारी सांगितले की, अफगाणी लष्कर व हवाई दलाने कंदहार प्रांतातील मेवाड जिल्ह्यात तालिबानी ठिकाणांवर हल्ले केले. त्यात २४ तासांत ३६ अतिरेक्यांचा मृत्यू झाला. अफगाणी सुरक्षा दलाने काही दिवसांपासून तालिबानी अतिरेक्यांविराेधात माेहीम उघडली आहे.
Air strikes in Afghanistan; 55 terrorists killed

Post a comment

 
Top