मुंबई - कॅशच्या टंचाईला सामोरे जाणाऱ्या महाराष्ट्र सरकारच्या मदतीला शिरडीच्या साई संस्थानने पुढाकार घेतला आहे. शिरडीच्या साईबाबा मंदिर ट्रस्टने सरकारला मोठा दिलासा देताना 'निळवंडे' सिंचन प्रकल्पासाठी कर्ज देणार असल्याची घोषणा केली. हे संपूर्ण 500 कोटी रुपयांचे कर्ज बिनव्याजी राहणार आहे. प्रकल्पासाठी बनणाऱ्या कालव्यापासून अहमदनगरच्या तहसीलांपर्यंत पाण्याचे संकट मिटणार आहे. सरकारकडून यासंदर्भातील प्रस्ताव शनिवारी मांडण्यात आला होता.
एका खासगी ट्रस्टने सरकारला एवढे मोठे बिनव्याजी कर्ज देण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे म्हटले जात आहे. या कर्जाची परतफेड करण्याची टेन्योर सुद्धा निश्चित करण्यात आलेला नाही. सुत्रांच्या माहितीनुसार, महाराष्ट्र सरकारने काही महिन्यांपूर्वी यासंदर्भात मदत मागण्यासाठी ट्रस्टशी संपर्क साधला होता. यानंतर ट्रस्टने बैठक घेऊन अशा प्रकारचा निर्णय घेतला. ट्रस्टचे चेअरमन सुरेश हवारे भाजपचे जवळचे अगदी मानले जातात.
1200 कोटींचा प्रोजेक्ट...
मंदिराकडून दिलेल्या माहितीप्रमाणे, साईबाबा मंदिर ट्रस्ट आणि गोदावरी-मराठवाडा सिंचन विकास कॉर्पोरेशनने यासाठी संमती पत्रावर स्वाक्षऱ्या केल्या. हा प्रकल्प गेल्या अनेक दिवसांपासून लांबला होता. यासाठी जवळपास 1200 कोटी रुपये खर्च येणार असा अंदाज आहे. यात जल संपदा विभागाने याच वर्षी बजेटमध्ये 300 कोटी रुपयांची तरतूद केली. पुढील वर्षी 400 कोटी जारी केले जातील. तर उर्वरीत 500 कोटी रुपये शिरडी साई ट्रस्ट देत आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post a Comment