नाशिक- अाैद्याेगिक, व्यावसायिक वीजग्राहकांना गेल्या महिन्यापासून वाढलेल्या वीजबिलाचा अाकडा पाहून झटका बसलेला असतानाच अाता घरगुती वीजग्राहकांचीही अशीच स्थिती झाल्याचे पहायला मिळत अाहे. विजेचा नाममात्र वापर असतानाही अाकारले गेलेले भरमसाठ अाकार यामुळे वीजबिलाचा अाकडा फुगत असल्याने ग्राहकांमध्ये संताप पहायला मिळत अाहे. अवघ्या ५० युनिट वीजवापराकरिता ४१७ रुपयांचे वीजबिल ग्राहकांच्या घरी पाठविले जात असल्याने सामान्यांनादेेखील दैनंदिन अत्यावश्यक गरजांकरता विजेचा वापर करणे मुश्कील हाेऊन बसले अाहे.
एका बाजूला स्वयंपाकाचा गॅस दिवसेंदिवस भडकत असल्याने देशभर गृहिणींकडून अाेरड एेकायला मिळत असतानाच अाता राज्यात महावितरणला वीज नियामक अायाेगाने दरवाढीला दिलेल्या मान्यतेचे परिणाम घराघरांपर्यंत दिसू लागले अाहे. अाैद्याेगिक अाणि घरगुती ग्राहकांना याचा सर्वाधिक फटका बसत अाहे. ९० टक्के अाैद्याेगिक ग्राहकांना पाॅवर फॅक्टर डिस्काउंट मिळणे अशक्यप्राय झाले असून सरासरी १५ दरवाढीचा सामना करावा लागत अाहे. यातच अाता घरगुती वीजग्राहकांनाही वीज दरवाढीची झळ जाणवायला लागली अाहे, जी त्यांच्या क्षमतेच्या बाहेर अाहे.
सामान्यांची केली जातेय सर्रास लूट
अाम्ही विजेची बचत करून महिन्याला ५० युनिटपर्यंत वीज वापरताे, तरीही थेट ४१७ रुपयांचे वीजबिल अाले अाहे. निव्वळ युनिटप्रमाणे बिल अाकारणे गरजेचे अाहे. मात्र वेगवेगळ्या अाकारांच्या स्वरूपांत सर्रास लूट सुरू झाली अाहे. - संगीता काेठूरकर, गृहिणी
अायाेगाच्या निकालाविरुद्ध दावा
वीज नियामक अायाेगासमाेर वीज दरवाढीला प्रचंड विराेध हाेऊनही अायाेगाने त्याला मंजुरी दिली, ज्याचा फटका अाज अाैद्याेगिक व घरगुती वीजग्राहकांना प्रचंड प्रमाणावर बसला अाहे. अायाेगाच्या निर्णयाला अाव्हान देणारी याचिका अाम्ही दाखल केली अाहे.

Post a Comment