0
२६ वर्षांपासून देशात नववर्षाची परंपरा

साओ पावलो- ब्राझीलमध्ये नव्या वर्षाच्या स्वागताचे कार्यक्रम धूमधडाक्यात सुरू झाले आहेत. शुक्रवारी साओ पावलो शहरात लोकांनी ५० हजार बायोडिग्रेडेबल फुगे आकाशात सोडून मावळत्या वर्षास निरोप दिला. शुक्रवारी साओ पावलो शहरात लोकांनी ५० हजार बायोडिग्रेडिबल फुगे हवेत सोडून मावळत्या वर्षास निरोप दिला. हे फुगे हवेत नष्ट होऊ जमिनीत मिसळतात.याची पर्यावरणास कोणतीही हानी होत नाही. हा कार्यक्रम साओ पावलो मर्चंट असोसिएशनने आयोजित केला होता.या संस्थेच्या अध्यक्षा अॅलेनकार यांनी सांगितले,' २०१८ मध्ये ब्राझील व इतर देशातील लोकांना खूप आव्हानांचा सामना करावा लागला. त्याबद्दल त्यांनी लोकांचे अाभार मानले . ब्राझीलमध्ये ही परंपरा २६ वर्षापासून सुरू आहे.

ब्राझीलमध्ये नव्या वर्षाच्या निमित्ताने प्रथमच १९९१ मध्ये १०० शंभर फुगे आकाशात सोडण्यात आले होते. तेव्हापासून ही परंपरा सुरू झाली. येथे नवे वर्षांच्या स्वागताची अशी परंपरा ४ दिवस आधीपासूनच सुरू होते.

ख्रिसमस : विक्रीत ५.५ टक्क्यांनी वाढ
नॅशनल रिटेलर्स असोसिएशनने म्हटले, २०१८ मध्ये ख्रिसमसच्या निमित्ताने विक्रीत ५.५ वाढ झाली आहे. ७३ हजार तात्पुरत्या नोकऱ्या निर्माण झाल्या. यामुळे हे वर्ष आनंददायी ठरले
50 thousand baloons are in sky in Brazil

Post a Comment

 
Top