घटक पक्षांनाही जागा सोडणार
मुंबई - आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपविरोधात एकत्रित लढण्याच्या निर्णयावर काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या राज्यस्तरीय नेत्यांमध्ये एकमत झाले आहे. तरीही तीन ते चार जागांच्या वाटपाचा घोळ मात्र संपलेला नाही. त्यामुळे आता एकमत न होऊ शकलेल्या जागांबाबत दोन्ही पक्षांच्या केंद्रीय स्तरावरील नेत्यांमध्ये चर्चा होणार असल्याचे समजते. यासाठी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात शरद पवार व राहुल गांधी यांच्यात थेट चर्चा होऊन १५ ते २० दिवसांत आघाडीच्या जागावाटपाचा अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे. शुक्रवारी दोन्ही पक्षांच्या नेत्यांची बैठक पार पडल्यानंतर माध्यमांकडे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, जागावाटपाची राज्यस्तरीय चर्चा आता संपली असून पुढील निर्णय आता दिल्लीत होईल. दोन्ही पक्षांचे संबंधित नेते आमच्यातल्या चर्चेचा अहवाल आपापल्या पक्षनेतृत्वाला सुपूर्द करतील आणि त्याआधारे लवकरच अंतिम निर्णय अपेक्षित आहे.आघाडीचा घटक पक्षांनाही सामावून घेण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीला पालघर, राजू शेट्टींच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेला कोल्हापुरमधील हातकणंगले आणि एमआयएमची साथ सोडल्यास प्रकाश आंबेडकरांच्या भारिप बहुजन महासंघाला अकोला मतदारसंघ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आरपीआय गवई गटाच्या राजेंद्र गवईंनीही आघाडीत जागेची मागणी केली असून त्यावर अद्याप निर्णय नाही. सिंधुदुर्ग-रत्नागिरमध्ये राणेंना छुपी रसद?
आघाडीच्या जागावाटपाच्या चर्चेत नारायण राणेंच्या पुत्रासाठी सिंधुदुर्ग-रत्नागिरी हा मतदारसंघ सोडण्याबाबत कोणतीही अधिकृत चर्चा झाली नसली तरीही काँग्रेसच्या कोट्यातील या मतदारसंघाची राष्ट्रवादी काँग्रेसने मागणी केली आहे. शिवसेना आणि भाजपची युती झाल्यास राष्ट्रवादी काँग्रेस नारायण राणेंना रसद पुरवून या मतदारसंघातून त्यांना छुपा पाठिंबा देण्याची शक्यता आहे.सध्या या मतदारसंघातून शिवसेनेचे विनायक राऊत हे खासदार असून कोणत्याही परिस्थितीत हा मतदारसंघ पुन्हा जिंकण्यासाठी नारायण राणेंनी कंबर कसली आहे. त्यासाठी भाजपच्या कोट्यातून राज्यसभेवर गेलेल्या राणेंनी प्रसंगी भाजपशी पंगा घेण्याची तयारीही ठेवल्याचे समजते.
घटक पक्षांनाही जागा सोडणार
काँग्रेसचा २००९ च्या सूत्रानुसार जागा वाटपावर भर आहे. मात्र राष्ट्रवादीने २०१४ मधल्या वाढलेल्या ताकदीच्या अनुषंगाने जोर लावला आहे. घटकपक्षांना जागा सोडण्याची दोन्हीही पक्षांची तयारी आहे.
काँग्रेसचा २००९ च्या सूत्रानुसार जागा वाटपावर भर आहे. मात्र राष्ट्रवादीने २०१४ मधल्या वाढलेल्या ताकदीच्या अनुषंगाने जोर लावला आहे. घटकपक्षांना जागा सोडण्याची दोन्हीही पक्षांची तयारी आहे.

Post a Comment