0
चाणक्यांच्या म्हणण्यानुसार उत्तम आरोग्य हे सर्वात मोठे धन आहे.

अनेक जण दिवसातून किमान एकदा स्नान करतात. प्रत्येकाचे रोजचे नित्याचे स्नान म्हणजे सकाळचे स्नान असते. मात्र आचार्य चाणक्य त्यांच्या नितीशास्त्रात काही मौलिक गोष्टी सांगतात. त्यानुसार काही कामे केल्यानंतर स्नान करणे गरजचे होऊन जाते. काय सांगतात आचार्य चाणक्य ...

तैलाभ्यङ्गे चिताधूमे मैथुने क्षौरकर्मणि।
तावद् भवति चाण्डालो यावत् स्नानं न चाचरेत्।

चाणक्यांच्या म्हणण्यानुसार उत्तम आरोग्य हे सर्वात मोठे धन आहे. त्यामुळेच आरोग्याच्या बाबतीत प्रत्येकाने सतर्क असले पाहिजे आणि त्या साठीच काही नियम घालून देण्यात आले आहेत. योग्य आहार-विहाराचा आपल्या शरीर आणि मनावर परिणाम होत असतो. अनेक आजार तर फक्त अंघोळ केल्याने बरे होणारे असतात. लांबचा प्रवास किंवा उन्हातून आल्यानंतर आलेला थकवा अंघोळ केल्याने दूर होतो. वरील श्लोकात चाणक्यांनी चार कामे केल्यानंतर स्वस्थ आरोग्यासाठी स्नान कसे गरजेचे आहे ते विषद केले आहे.

पहिले काम - तेल मालिश केल्यानंतर स्नान गरजेचे
चाणक्य सांगतात, उत्तम आरोग्य आणि शरीर संपदेसाठी तसेच तजेलदार व चमकदार त्वचेसाठी आठवड्यातून एकदा पूर्ण शरीराची तेल मालिश गरजेची आहे. तेल मालिश केल्यानंतर शरीरावरील अनेक सुक्ष्म छिद्रे मोकळी होतात आणि आतील मल बाहेर पडतो. तेल मालिश झाल्यानंतर लगेच स्नान केले पाहिजे. त्यामुळे मालिशने बाहेर आलेला मल शरीरावरुन धुवून काढता येतो. त्यामुळ त्वचा चमकदार होते. तेल मालिश केल्यानंतर स्नान न करणे अशुभ मानले जाते.

दुसरे काम - अंत्ययात्रेवरुन परतल्यानंतर स्नान केले पाहिजे
जर तुम्ही एखाद्याच्या अंत्ययात्रेत गेले असाल तर स्मशानभूमीमध्ये अनेक प्रकारचे जंतू असता. तुम्ही तिथे काही वेळ घालवल्याने ते तुमच्या शरीरावर असण्याची शक्यता असते. यामुळे स्मशानातून आल्यानंतर स्नान केल्याने शरीर रोगमुक्त राहाते. आरोग्याच्या दृष्टीने या कामानंतर स्नान गरजेचे आहे.

तिसरे काम - समागमानंतर स्नान गरजेचे
स्त्री असो अथवा पुरुष प्रेम-प्रसंगानांतर (काम क्रिया) स्नान करणे अत्यावश्यक आहे. या कामानंतर स्त्री असेल किंवा पुरुष अपवित्र होतात असे चाणक्य सांगतात. त्यामुळे यानंतर स्नान केल्याशिवाय त्यांनी कोणतेही काम करु नये. धार्मिक कार्य तर मुळीच करु नये. चाणक्य नितीनुसार या कामानंतर स्नान केल्याशिवाय घऱाबाहेर जाऊ नये.

चौथे काम - केश कर्तनानंतर स्नान गरजेचे आहे
आचार्य चाणक्य म्हणतात, केश कर्तनानंतर (केस कापल्यानंतर) लगेचच स्नान करणे गरजेचे असते. कारण केस कापल्यानंतर संपूर्ण शरीरावर केस पडतात. ते शरीरावर चिकटून राहातात. स्नान केल्यानंतरच शरीर पूर्णपणे स्वच्छ होते. त्यामुळे या कार्यानंतरही स्नान करणे गरजेचे आहे.
Tips For Happy Life From Chanakya Niti

Post a comment

 
Top