0
रिझर्व्ह बँकेच्या धोरणात किरकोळ महागाई दराचा विचा

नवी दिल्ली- खाद्यपदार्थांच्या वस्तू विशेष करून भाज्या आणि पेट्रोल-डिझेलच्या किमतीमध्ये घसरण झाल्यामुळे नोव्हेंबरमध्ये घाऊक महागाई दर कमी होऊन ४.६४ टक्के नोंदवण्यात आला आहे. घाऊक महागाईचा हा दर गेल्या तीन महिन्यांत सर्वात कमी आहे. ऑक्टोबरमध्ये हा ५.२८ टक्के अाणि गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये ४.०२ टक्के होता. नोव्हेंबरमध्ये किरकोळ महागाई दरही २.३३ टक्क्यांवर होता, जो १७ महिन्यांतील सर्वात कमी आहे.

घाऊक महागाई कमी होण्याचे प्रमुख कारण खाद्यपदार्थ गेल्या वर्षभराच्या तुलनेमध्ये स्वस्त होणे हेच आहे. नोव्हेंबरमध्ये खाद्यपदार्थांच्या वस्तूंचा घाऊक महागाई दर (-)३.३१% होता, तर ऑक्टोबरमध्ये हा (-)१.४९% होता. इंधन आणि ऊर्जा वर्गातील घाऊक महागाई दर नोव्हेंबरमध्ये १६.२८ टक्के राहिला. ऑक्टोबरमध्ये हा १८.४४ टक्के होता. प्रामुख्याने जागतिक पातळीवर कच्च्या तेलाच्या दरात झालेली घसरण आणि त्यानंतर पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी झाल्याने महागाई दरातही घसरण नोंदवण्यात अाली आहे. असे असले तरी गेल्या वर्षी नोव्हेंबरच्या तुलनेमध्ये स्वयंपाकाचा गॅस २३.२२ टक्के, डिझेल २०.१६ टक्के आणि पेट्रोल १२.०६ टक्के महाग झाले आहे.

रिझर्व्ह बँकेच्या धोरणात किरकोळ महागाई दराचा विचार
रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण आढावा बैठकीमध्ये दर निश्चित करताना किरकोळ महागाई दराचा विचार केला जातो. गेल्या आठवड्यात पतधोरण आढाव्याच्या पाचव्या द्वैमासिक आढावा बैठकीत रिझर्व्ह बँकेने व्याजदर कायम ठेवले होते. मान्सून सामान्य बरसल्याने आणि खाण्यापिण्याच्या वस्तूंत झालेली घसरण पाहता रिझर्व्ह बँकेने चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या सहामाहीमध्ये किरकोळ महागाई दराचा अंदाज कमी करून २.७ ते ३.२ टक्के केला आहे. आॅक्टोबरमध्ये द्वैमासिक आढावा बैठकीत रिझर्व्ह बँकेने दुसऱ्या सहामाहीमध्ये हा ३.९९ ते ४.५ टक्क्यांच्या दरम्यान राहण्याचा अंदाज व्यक्त केला होता.Inflation eases to 4.64 percent in November

Post a comment

 
Top