0
नवजीवन कॉलनीतील प्रकार, ४५ हजारांचा ऐवज लंपास

औरंगाबाद - कुटुंबासह चिंचोली येथे सासुरवाडीस गेलेल्या बँक अधिकाऱ्याचे घर फोडून चोरट्यांनी ४५ हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेला. हडको परिसरातील नवजीवन कॉलनीतील घराचे दोन गेट व मुख्य दरवाजा तोडून चोरांनी आत प्रवेश केला होता. रविवारी सकाळी कुटुंब गावाहून परतल्यावर हा प्रकार समोर आला.


इंडसइंड बँकेत व्यवस्थापक सचिन आनंदराव कुलकर्णी हे शनिवारी कुटुंबासह सासुरवाडीला कार्यक्रम असल्याने चिंचोली गावाला गेले होते. शनिवारी रात्री त्यांनी गावाकडेच मुक्काम केला. रविवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास घरी परतल्यावर त्यांना चोरी झाल्याचे समजले. सिडको पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक भारत पाचोळे यांनी पथकासह घटनास्थळी जाऊन पाहणी केली. श्वान पथकातील श्वान काही अंतरावर असलेल्या मॉल जवळील हॉटेलपर्यंत जाऊन घुटमळले. सिडको पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून ४५ हजारांमध्ये सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम असल्याचे पोलिसांनी सांगितले. हेड कॉन्स्टेबल रमेश जाधव पुढील तपास करत आहेत.


दुकान फोडून अर्धा तासात ५९ हजारांचा ऐवज चोरीला : २३ डिसेंबर रोजी मध्यरात्रीतून चोरांनी समर्थनगर येथील 'भावना सुपारी' हे दुकान फोडून ४६ हजार रुपये रोख, ८ हजार रुपये किमतीचे होम थिएटर व पाच हजार रुपयांचा किराणा सामान चोरुन नेला. दुकानाचे मालक गणेश सुभाष ढोले हे रात्री दुकानाला कुलूप लावून गेले. मध्यरात्री साडेबारा ते एकच्या दरम्यान दोन चोरांनी दुकानाचे लाकडी दाराचे कडी काेयंडे वाकवून आत प्रवेश केला.


त्यानंतर दुकानातील ड्राॅवरचे कुलूप तोडून अर्धा तासात ऐवज चोरुन नेला. क्रांती चौक पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून सहायक फौजदार देशमुख पुढील तपास करत आहे.
Bank officers house robbed

Post a Comment

 
Top