0
कोहली एका वर्षात विदेशात सर्वाधिक धावा करणारा (1138) फलंदाज ठरला.

मेलबर्न - ऑस्ट्रेलिया दौऱ्याच्या तिसऱ्या कसोटीत भारताने दुसऱ्या दिवशी 7 बाद 443 धावांवर डाव घोषित केला. पुजाराने पुन्हा एकदा शतकी खेळत भारताला मोठी धावसंख्या उभारण्यास मदत केली. तर मयांक पाठोपाठ कोहली आणि रोहित शर्माने झळकावलेल्या अर्धशतकांनीही भारताला मोठी मदत मिळाली. दुसऱ्या दिवसअखेर ऑस्ट्रेलियाने बिनबाद 8 धावा केल्या आहेत.

पुजाराचे शतक ठरले खास 
>> पुजाराने 17वे कसोटी शतक ठोकत माजी भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीली मागे टाकले. गांगुंलीच्या नावे 16 कसोटी शतके आहेत. 
>> या शतकासह पुजाराने व्हीव्हीएस लक्ष्मणच्या 17 शतकांची बरोबरी केली आहे. 
>> बॉक्सिंग-डे टेस्टमध्ये शतक करमारा पुजारा पाचवा भारतीय फलंदाज आहे. त्याच्याआधी सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग, विराट कोहली आणि अजिंक्य राहाणे यांनी अशी कामगिरी केली आहे. 
>> पुजाराने शतकासाठी 280 चेंडू खेळले. यासह ते ऑस्ट्रेलियात सर्वाधिक चेंडू खेळून शतके करणाऱ्या भारतीयांच्या यादीत तिसऱ्या स्थानी आहे. या प्रकरणी रवी शास्त्री पहिल्या क्रमांकावर आहे. 1992 मध्ये शास्त्रींनी 307 चेंडू खेळत तर 1985 मध्ये गावस्कर 286 चेंडू खेळत शतक केले होते. 
>> पुजारा 1 जानेवारी 2017 पासून आतापर्यंत कसोटीत सर्वाधिक 4000 हून अधिक चेंडूंचा सामना करणारा फलंदाज बनला आहे. त्याने 40 डावांत 116 च्या सरासरीने 4633 चेंडू खेळले. 
>> या शतकासह पुजाराने विदेशात सहा मैदानांवर सात शतके केली आहेत. त्यात श्रीलंकेतील कोलंबो आणि गाले, दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग, इंग्लंडमधील साउथॅम्पटन आणि ऑस्ट्रेलियाच्या अॅडिलेड आणि मेलबर्नचा समावेश आहे.

विराट द्रविडच्या पुढे 
विराट कोहली 82 धावा काढून बाद झाला. पण एका कॅलेंडर ईअरमध्ये विदेशात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज तो बनला आहे. त्याने यावर्षी आतापर्यंत 11 सामन्यांत 1138 धावा केल्या आहेत. त्याने द्रविडचा विक्रम मोडत ही कमगिरी केली. द्रविडने 2002 मध्ये 1137 धावा केल्या होत्या. पण ऑस्ट्रेलियात सर्वाधिक शतकांचा त्याचा विक्रम हुकला आहे. कोहली आणि सचिन दोघांची ऑस्ट्रेलियात प्रत्येकी 6 शतके आहेत.

रोहितचे 10 वे अर्धशतक 
रोहित शर्माने कसोटी कारकिर्दीतील 10वे अर्धशतक पूर्ण केले. त्याने कसोटींच्या सहा डावांनंतर 50 पेक्षा जास्त स्कोअर केला. यापूर्वी त्याने गेल्यावर्षी डिसेंबरमध्ये दिल्लीत श्रीलंकेविरोधात 50 धावांची नाबाद खेळी केली होती.Ind vs Aus India declared inning on 443 on 2nd Day of test

Post a comment

 
Top