0

मित्राने दाखविलेल्या साहसामुळे अमितचे प्राण वाचले.

मुंबई- खापोली रेल्वे स्टेशनवरील एक हृदय पिळवटून टाकणारा व्हिडिओ समोर आला आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ झपाट्याने व्हायरल होत आहे. एक तरुणी प्लॅटफॉर्म आणि रेल्वे रुळामधील गॅपमध्ये फसला होता. त्याच्या एका मित्राने त्याचा हात पकळलेला होता. तरुणाच्या डोक्याजवळून वेगात ट्रेन जात होती. जवळपास 44 सेकंड जीवन-मृत्यूझा संघर्ष सुरु होता.

मिळालेली माहिती अशी की, हा व्हिडियो 23 डिसेंबरचा आहे. अमित शेंडगे नामक तरुण खापोली स्टेशनवर आपल्या 5 मित्रासोबत स्टेशनवर होता. रात्री ट्रेनमध्ये चढताना तो प्लॅटफार्म आणि ट्रेनमधील गॅपमध्ये पडला. तितक्यात ट्रेन सुरु झाली. अमितला वाचविण्यासाठी त्याचा मित्र प्लॅटफॉर्मवरच थांबला. त्याने अमितचा हात घट्ट पकडला होता. अमितने थोडीही हालचाल केली असती तर त्याच्या जिवावर बेतले असते. मित्राने दाखविलेल्या साहसामुळे अमितचे प्राण वाचले.

Post a comment

 
Top