0
गोरखधंदा औषधी विकणाऱ्या महिलेस रंगेहात पकडले, औषधे पुरवणाऱ्या तोतयालाही अटक

अकोला- डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय गर्भपाताचे औषधे मिळत नाहीत. मात्र अवैधरीत्या गर्भपाताचे औषधे विकणाऱ्या रॅकेटचा गुरुवारी पर्दाफाश करण्यात आला. पोलिस-आरोग्य विभाग व अन्न औषध विभागाने बनावट ग्राहक बनवून पाठवलेल्या एका महिलेला ४३३.९० रुपये किमतीच्या पाच गर्भपाताच्या गोळ्या ४ हजार रुपयांत विकताना संध्या नामक महिलेला रंगेहात पकडले. तसेच तिला औषधे पुरवणाऱ्या तोतयालाही पोलिसांनी पकडले.

जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाकडे एक तक्रार प्राप्त झाली. त्यात म्हटले होते की, शहरात गर्भपाताच्या गोळ्यांची विक्री होत आहे. त्यानुसार जिल्हा शल्य चिकित्सक अधिकारी यांच्या आदेशानुसार अन्न व औषध प्रशासन विभागात एक बैठक झाली. यावेळी कारवाई करताना पोलिसांना सोबत घेण्यावर एकमत झाले व त्यांनी गुरुवारी दुपारी सापळा रचला. यावेळी पोलिसांनी एका महिलेला ग्राहक म्हणून समोर केले. या महिलेने संध्या नामक महिलेला फोन केला व मला गर्भपात करायचा आहे. त्यासाठी गोळ्या पाहिजेत म्हटले. त्यानंतर संध्याने महिलेने बसस्थानकावर गोळ्या घेऊन येतो म्हणून सांगितले. ठरल्याप्रमाणे संध्या गोळ्या घेऊन आली, तिने चार हजार रुपये घेतले आणि पाच गोळ्या असलेली स्ट्रिप महिलेला देताच दबा धरून बसलेल्यांनी संध्याला ताब्यात घेतले. त्यानंतर तिच्या घराची झडती घेतली असता तिच्या घरातून गर्भपातासाठी लागणारे औषधे, हॅन्डग्लोज, सिरीज आणि इतर काही औषधे दिसून आली. पोलिसांनी ते जप्त करून महिलेला व औषध पुरवणारा संजू जैन यास ताब्यात घेतले. ही कारवाई आरोग्य विभागाचे डॉ. मिना शिवाल, गजानन चव्हाण, अंकुश गंगाघाटकर, अन्न औषध प्रशासन विभागाचे अधिकारी हेमंत मेतकर व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक कैलास नागरे यांच्या पथकाने केली. अन्न व औषध प्रशासन विभागाचे औषध निरीक्षक हेमंत मेतकर यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध अन्न औषध मानके अधिनियम १८ (सर), २७(बी), २८ नुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु केली होती.

२०१७ मध्येही झाली होती कारवाई
जुने शहरातील भारती प्लॉट येथील सुनील हिम्मतराव निचड या आरोपीला अवैधपणे गर्भपाताच्या गोळ्या विकण्याच्या आरोपावरून आरोग्य विभागाच्या भरारी पथकाने २७ मार्च २०१७ रोजी कारवाई केली होती. त्यानंतरची ही दुसरी कारवाई आहे. यावेळी महिलेकडून आरोपीने पाच हजार रुपये स्वीकारले व त्याबदल्यात त्याने गर्भपाताच्या पाच गोळ्या पुडीमध्ये बांधून दिल्या होत्या.

आदर्श कॉलनीतील महिलेच्या घरी सापडली गर्भपाताची औषधी
कारवाई नंतर संध्या नामक महिलेला पोलिस तिच्या घरी घेऊन गेले. तेथून पोलिसांना ऑक्सीटोसिन इंजेक्शन जे की महिलेला कळा येण्यासाठी तसेच दूध देण्यासाठी जनावरांवर सुद्धा त्याचा उपयोग केल्या जातो, कॉम्बीपॅकऑप मिझोप्रिस्टम घटक असलेले गॅस्ट्रो प्रो नावाच्या गोळ्याचे पॅकेट, सलाइन, हॅन्ड ग्लोज, गर्भपातादरम्यान रक्तस्राव झाल्यास तो थांबवण्याची औषधे, सिरीज आणि इतर औषधे पथकाने जप्त केली.

आदर्श कॉलनीतील महिलेच्या घरी सापडली गर्भपाताची औषधी
कारवाई नंतर संध्या नामक महिलेला पोलिस तिच्या घरी घेऊन गेले. तेथून पोलिसांना ऑक्सीटोसिन इंजेक्शन जे की महिलेला कळा येण्यासाठी तसेच दूध देण्यासाठी जनावरांवर सुद्धा त्याचा उपयोग केल्या जातो, कॉम्बीपॅकऑप मिझोप्रिस्टम घटक असलेले गॅस्ट्रो प्रो नावाच्या गोळ्याचे पॅकेट, सलाइन, हॅन्ड ग्लोज, गर्भपातादरम्यान रक्तस्राव झाल्यास तो थांबवण्याची औषधे, सिरीज आणि इतर औषधे पथकाने जप्त केली.

प्रिस्क्रिप्शनशिवाय कसे शक्य
गर्भपाताची औषधे डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय कुणालाही मिळणे शक्य नाही. मग ही औषधे आरोपीकडे आली कोठून हा प्रश्न आहे. पोलिसांनी पकडलेला संजू जैन नामक युवक हा मेडिकलमध्ये काम करत असल्याने तेथून तर तो ही औषध आणत नसावा, की त्याला कुण्या डॉक्टरांचे सहकार्य तर नाही ना? असा प्रश्न उपस्थित होत असून, त्याचा शोध घेण्याची गरज आहे.

असे केले स्टिंग..
जिल्हा शल्य चिकित्सक आरती कुलवाल यांंनी आरोग्य विभागातील डॉक्टर, अन्न व औषध प्रशासन अधिकारी व पोलिसांचे संयुक्त पथक गठीत केले. त्यानंतर एक बनावट ग्राहक म्हणून एका महिलेला सोबत घेतले. महिलेने संध्या नामक महिलेच्या मोबाइल नंबरवर फोन करण्यास सांगितले. महिला म्हणाली, मला गर्भपात करावयाचा आहे. तुमचा पत्ता मला मिळाला आहे. तरी मला गर्भपाताच्या गोळ्या हव्या आहेत. त्यावर चार हजार रुपये लागतील. पाच गोळ्यांमध्ये काम फत्ते होईल. तशी गॅरंटी असल्याचे संध्याने महिलेला सांगितले. त्यावरून त्यांच्यात बसस्थानकाजवळ भेटण्याचे ठरवले. महिला आणि आरोग्य विभागाचे पथक तेथे पोहोचले. विशिष्ट अंतर ठेवून पथक मागेच थांबले आणि महिला ठरलेल्या ठिकाणावर दुपारी १२ वाजता पोहोचली. संध्या तेथे आली आणि त्यांच्यात व्यवहार झाल्यानंतर महिलेने इशारा केल्यानंतर पथक पोहोचले व त्या महिलेला रंगेहात ताब्यात घेतले.An illegal abortion racket exposed in Akola

Post a Comment

 
Top