सुनामीचा तडाखा बसलेल्या किनारपट्टीवर जाऊ नये, असा इशारा इंडोनेशियाच्या सरकारने नागरिकांना दिला आहे..
- सुमूर- सुनामीचा तडाखा बसलेल्या किनारपट्टीवर जाऊ नये, असा इशारा इंडोनेशियाच्या सरकारने नागरिकांना दिला आहे. त्या पार्श्वभूमीवर बुधवारी हजारो लोकांनी कुटुंबकबिल्यासह सुरक्षित ठिकाणे गाठली. क्रॅटाकाटोआच्या ज्वालामुखीचा बुधवारी उशिरा पुन्हा उद्रेक होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांत भीती आणखी दाटली. त्यातूनच स्थलांतर वाढले. १४ वर्षांपूर्वी इंडोनेशियाच्या पश्चिमेकडील किनाऱ्याला प्रलंयकारी भूकंपाचा धक्का बसला होता. त्यात मोठी प्राणहानी झाली होती. बुधवारी कटू स्मृतीला उजाळा मिळाला.मृतांची संख्या ४२० हून जास्त
दोन दिवसांपूर्वी आलेल्या नैसर्गिक संकटात ४२० हून अधिक लोक मृत्युमुखी पडले. ज्वालामुखीच्या उद्रेकानंतर आलेल्या सुनामीने इंडोनेशियात मोठी प्राणहानी झाली होती.१६ फुटांच्या लाटांचे तांडव
सुमूर येथे काही भागात ५ मीटर (१६.४ फूट) लाटांच्या खुणा आढळून आल्या आहेत. त्यावरून अत्यंत वेगवान व अजस्र लाटांमुळेच उंच इमारती, झाडे मुळासकट कोसळली.
Post a Comment