0

अर्ज भरण्याची शेवटची तारीख 1 जानेवारी 2019.


नवी दिल्ली- मोदी सरकार 42 लाख जिंकण्याची संधी देत आहे. सरकार Ease Of Doing business ग्रँड चॅलेंजच्या अंतर्गत सामान्या लोकांकडून अर्ज मागत आहे, जे सरकारला इनोवेटिव्ह आयडिया देऊ शकतील. यामुळे सरकारला योजना बरोबर पद्धतीने लागु करण्यास मदत मिळेल. यासाठी सरकारकडून स्टार्टअप इंडिया वेबसाइटची जाहिरात जाहिर केली आहे. त्यासोबतच स्टार्टअप इंडियाच्या ट्वीटर हँडलवरूनही जाहिरात देण्यात आली आहे.


काय करावे लागेल?
सरकारने सात फिल्डसाठी लोकांकडून अर्ज मागितले आहेत. प्रत्येक फिल्ड मधल्या टॉप 3 स्पर्धकांची निवड केली जाईल. पहिल्या नंबरच्या स्पर्धकाला 3 लाख, दुसऱ्या नंबरच्या स्पर्धकाला 2 लाख आणि तिसऱ्या नंबरच्या स्पर्धकाला 1 लाख रूपये दिले जातील. यातील सगळ्या कॅटेगरीवर सरकार एकुण 42 लाख रूपये देणार आहे. ज्या फिल्डसाठी सरकारकडून अर्ज मागितले आहेत त्यात लाइसमस अँड परमिट, एक्सपोर्ट अँड लॉजिस्टिक, प्रॉपर्टी इंफार्मेशन सिस्टीम आणि टॅक्स फाइलिंग हे आहेत. जर तुमच्याकडेही या फिल्डच्या विकासासाठी चांगल्या कल्पना आहेत तर तुम्हीही अर्ज भरू शकता.


कोण करू शकतो अप्लाय? 
तुमच्याकडे सरकारने दिलेल्या या फिल्डसाठी काही इनोवेटीव्ह आयडिया असतील ज्यामुळे सरकारला मदत होईल तर तुम्ही त्याना www.startupindia.gov.in वर सबमिट करू शकता. यात तुम्ही एकटे किंवा ग्रुपने सहभागी होऊ शकता. अर्ज भरण्यीची शेवटची तारीख 1 जानेवारी 2019 आहे.How to apply for ease of doing business grand challenge

Post a Comment

 
Top